मृत्यूवेळेची ग्रहस्थिती आणि अदृश्य जीवनाचा अभ्यास

मृत्यूवेळेची ग्रहस्थिती आणि अदृश्य जीवनाचा अभ्यास
  • Positive News
  • जुलै 27 2025

Share on  

मृत्यूवेळेची ग्रहस्थिती आणि अदृश्य जीवनाचा अभ्यास

जन्मानंतर आपण जशी जन्म लग्न पत्रिका बघतो त्याचप्रमाणे मृत्यूवेळी निव्वळ नक्षत्र न बघता त्यावेळेची पूर्ण ग्रहस्थिती बघितली तर?

पंचांगमध्येही नक्षत्र बघावे, तिथी बघावी हे सांगितलेलेच आहे. पण या ठिकाणी पूर्ण ग्रहस्थिती तीही मृत्यूवेळेची हा विषय वेगळा आहे पण नवीन नाही.

आज आपल्याला हा विषय नवीन असला तरी तो नवीन नाही. कारण काळाच्या आड गेलेले हे शास्त्र आहे. पूर्वी हा भाग बघितला जात असावा असणारच.*

भारतावर असंख्य परकीय आक्रमणे आणि ग्रंथाची झालेली होळी यामुळे या शास्त्राचे नाही तर अशी अनेक शास्त्र आहेत. ती काळा आड केलेली आहेत.

जन्म लग्नावरून ज्या पद्धतीने आपण त्याच्या पुढील आयुष्याची दृश्य गती पाहतो तशी मेल्यानंतर त्यावेळीवरून अदृश्य जीवनाची माहिती आपल्या समोर आली पाहिजे.

जन्म, लग्न कुंडली, त्या पूर्वीची गर्भ कुंडली, आणि मृत्यू लग्न कुंडली यावरून याचा अभ्यास करता येईल. तो कसा करायचा त्यांचाही आपल्याला विचार करावा लागेल कारण दृश्य जीवन ज्या प्रमाणे आहे तसे अदृश्य जीवनही आहे.

अज्ञानातील भाग म्हणून आपण त्यांचा विचार करत नाही. पण शास्त्रामध्ये यासाठी बरेच काही सांगितले आहे.आपल्या रोजच्या दैनंदिन पंचांगानुसारही सांगितले आहे.

पितरांना सांगितलेले अन्नदान, इतर श्राद्ध, सेवा याचाही भाग यातीलच आहे.

आपण नारायणबली, नागबली ,त्रिपिंडी, ,नांदीश्राद्ध, भागवत पारायण, पलाश विधी अशा प्रकारची अनेक श्राद्धे करतो. हे प्रकार एकूण 16 आहेत.

या श्राद्धांच्या पूजा प्रकारातून त्यांना गती मिळत असते. ही गती थांबून चालत नाही. जर ही गती थांबली, तर त्यांच्या मुक्त होण्याच्या मार्गात अडथळा येतो. म्हणून त्यांचा त्रास त्यांच्या वंशजांना ते देतात.

कालसर्पाचे एकूण 3456 प्रकार होतात त्या पैकी आपण 12 प्रकारचं सांगतो आपल्याला लागू होणारा एकच प्रकार आणि पितर दोष कोणता आहे हेच शोधणे महत्त्वाचे आहे आणि तीच गोष्ट या अभ्यासातून पूर्ण होईल.

आपले अनेक पितर हे गेलेले असतात. या अनेकातून सर्वच पितरांना मुक्ती मिळालेली नसते किंवा सर्वांचीच आपल्या वंशजानाविषयी तक्रार नसते‌. अशा पितरांची संख्या कमीच असते.आणि नेमकी कोणाची तक्रार आहे हेच आपल्याला शोधून काढायचे आहे. याचसाठी आपण ज्योतिषशास्त्राची मदत घेतो. ज्यावेळी यांचा विचार होईल त्यावेळी या मृत्यू लग्न कुंडलीवरून त्याचे आकलन होण्यास मदत होईल.


याच मृत्यूवेळेवरून तो मृत्यू अनैसर्गिक आहे का? याचाही बोध होईल. महामृत्यूसाठी कोणती वेळ योग्य असेल याचाही विचार होईल. वय झाल्यानंतर झालेला मृत्यू, तो महामृत्यू असे आपले काहीसे मत झालेले असते. पण असे असत नाही.*

महामृत्यु हा कोणत्याही वयात येऊ शकतो. तसा कोणत्याही वयात अपघाती मृत्यू येऊ शकतो. कारण नैसर्गिक मृत्यू होणार आहे त्याच्या आधी काही वेळ अपघाती मृत्यू झालेला आपण बघतो. याचाही विचार झाला पाहिजे

 डिस्क्लेमर

वरील लेख ज्योतिषशास्त्राच्या पारंपरिक मतांवर आधारित आहे. याला वैद्यकीय, वैज्ञानिक किंवा धार्मिक अंतिम सत्य समजू नये. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव, श्रद्धा व दृष्टिकोन वेगळा असतो. याचे अध्ययन श्रद्धा आणि वैयक्तिक निवडीवर आधारित आहे.

संबंधित बातम्या