दिल दोस्ती फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना स्टेशनरी किटचे वाटप; मान्यवरांनी दिला शिक्षण व आरोग्याचा प्रेरणादायी संदेश

दिल दोस्ती फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना स्टेशनरी किटचे वाटप; मान्यवरांनी दिला शिक्षण व आरोग्याचा प्रेरणादायी संदेश
  • Positive News
  • जून 25 2026

Share on  

 दिल दोस्ती फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना स्टेशनरी किटचे वाटप; मान्यवरांनी दिला शिक्षण व आरोग्याचा प्रेरणादायी संदेश

प्रतिनिधी, गिरणारे : गिरणारे येथील जनता विद्यार्थी वसतिगृहात सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी दिल दोस्ती फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी स्टेशनरी किटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमासाठी दिल दोस्ती फाउंडेशनचे लाइफ मेंबर तसेच न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त मा. श्री. उदय आहेर सर प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी प्रा. सुरेखा आहेर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत आपल्या ओघवत्या शैलीत प्रेरणादायी विचार मांडले. आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर जीवनात यश मिळवता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमास प्रख्यात हृदय शल्यचिकित्सक डॉ. सत्यजित उदय आहेर तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिवानी सत्यजित आहेर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उत्तम आरोग्य, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाले असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळाले आहे. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी दिल दोस्ती फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.

डिस्क्लेमर :
ही बातमी आयोजकांकडून प्राप्त माहितीनुसार तयार करण्यात आली असून तिचा उद्देश सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

 

संबंधित बातम्या