शांत झोप घेण्यासाठी स्लीप टुरिझम- पर्यटन उद्योगातील नवा ट्रेंड : डॉ अंजली जाधव, ठाणे
झोप घेण्यासाठी पर्यटन, ज्याला "Napcation" असेही म्हणतात, म्हणजेच nap vacation. सध्या लोकांचा कल अशा सहलींसाठी वाढत आहे जिथे लोक अशा काही ठिकाणी प्रवास करतात जिथे विश्रांती आणि झोपेला प्राधान्य दिले जाते, झोपेची गुणवत्ता आणि एकूणच प्रकृती सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
भारतात अनेक ठिकाणे या ट्रेंडला समजून घेत शांत झोप आणि शारीरिक विश्रांती साठी पूरक वातावरण आणि विविध उपचार पद्धती पुरवत आहेत.
झोपेच्या पर्यटनाची गरज का?
खरे तर आपल्याला ही कारणे शोधण्याची आवश्यकता आहे की लोक आता विश्रांती आणि झोपेला प्राधान्य देण्याचे मार्ग सक्रियपणे का शोधत आहेत?
संशोधन असे सांगते की भारतात ६०% पेक्षा जास्त लोक ७ तासांपेक्षा कमी झोपतात. झोपेच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांच्या यादीत भारत बराच आघाडीवर आहे. आणि ही खूप चिंताजनक परिस्थिती आहे. झोपेचा अभाव प्रामुख्याने ताणतणाव, जास्त काम, नातेसंबंधांच्या समस्या आणि सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे होतो.
बऱ्याच महिला चक्कर येणे, दिवसा झोपावेसे वाटणे, आळस, आनंदाचा अभाव याबद्दल तक्रारी करतात याला प्रामुख्याने रात्रीची अपुरी झोप हेच कारण असते.
एका संशोधन अहवालानुसार, येत्या ३ वर्षांत झोपेचे पर्यटन ८३ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल.
विविध ठिकाणे पाहण्यासाठी प्रवास करण्याऐवजी, लोक विश्रांती आणि झोपेसाठी च्या पर्यटनाला प्राधान्य देतील.
सध्या भारतात, विशेषतः दक्षिण भारतात असे अनेक रिसॉर्ट्स आहेत जिथे झोपेचे पर्यटन खूप वेगाने वाढत आहे. योग, ध्यानधारणा, मसाज थेरपी, संगीत थेरपी, ध्वनीरोधक खोल्यांमध्ये शांत झोप यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. काही रिसॉर्ट्समध्ये मेंदूचे निरीक्षण आणि न्यूरो फीडबॅक पाहून थेरपी दिली जाते. अशा सत्रांदरम्यान, ताण कमी करण्यासाठी आणि झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी पिवळे मंद दिवे, अरोमा थेरपी, संगीत थेरपी, ध्वनी उपचार, नियंत्रित श्वासोच्छ्वास, ध्यान यांचा सराव केला जातो.
शांत झोप केवळ मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक नाही तर एकूण शारीरिक आरोग्यासाठी देखील महत्त्वाची आहे. येत्या काही वर्षात झोपेचे पर्यटन हे केवळ लक्झरीच राहणार नाही तर शिक्षण, करिअर आणि अधिकाधिक पैसे, अधीकार कमावण्याच्या शर्यतीत संपूर्ण थकलेल्या मेंदू , मन आणि शरीराची गरज असेल.
लवकरच तुम्हाला स्लीप टुरिझम पॅकेजेसच्या जाहिराती सर्वत्र दिसतील.
झोपेच्या पर्यटनासोबतच शांत झोपेसाठी तुम्ही करत रहा .....smile