नाशिक : शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५
फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन, नाशिक आणि नामको हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री धन्वंतरी पूजन व श्री धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉ. नागेश मदनूरकर उपस्थित होते. त्यांच्यासह एफ.पी.ए. नाशिकचे अध्यक्ष डॉ. शीतल सुरजुसे, सचिव डॉ. विजय मुंदडा, सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. चंद्रतेज कदम, डॉ. अभिजित सोनावणे, डॉ. पल्लव कपूर, डॉ. निखिल कुलकर्णी, नामको हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर (ॲडमिनिस्ट्रेशन) श्री. समीर तुळजापूरकर आणि मेडिकल सुप्रिटेंडंट डॉ. विशाखा जहागिरदार हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अजय भंसाळी यांच्या गणेश वंदनाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन व श्री धन्वंतरी पूजन पार पडले. डॉ. तेजू सोलोमन यांनी आपल्या सुमधुर आवाजात श्री धन्वंतरी स्तवन सादर करून वातावरण भक्तिमय केले.
प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा सत्कार संघटनेचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.
सन २०२५ साठीचा श्री धन्वंतरी पुरस्कार ज्येष्ठ चिकित्सक व संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. गुलाब घरटे आणि सल्लागार समिती सदस्य डॉ. सौ. स्मिता कांबळे यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रुपेश मर्दा, डॉ. ज्योती पाटील, डॉ. सुनंदा मुंदडा, डॉ. मनिषा मर्दा, आणि डॉ. राखी मुथा यांनी अत्यंत आकर्षक व शिस्तबद्ध पद्धतीने केले.
आभारप्रदर्शन डॉ. मुक्तेश्वर जाधव यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामको हॉस्पिटलच्या मेडिकल सुप्रिटेंडंट डॉ. विशाखा पाटील, तेजस सावंत व संपूर्ण हॉस्पिटल स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.
संघटनेच्या १०० हून अधिक वैद्यकीय सभासदांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतगायनाने झाली. शेवटी सर्व उपस्थित सभासदांना भेटवस्तू देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.