फणस कापा की बरका? ओळखण्यासाठी फक्त सहा टिप्स अंदाज चुकणार नाही गरे खा पोटभर...
"फणस" वर्षातून एकदाच येणारे फळ. वर्षभरातून एकदाच खायला मिळणाऱ्या या फणसाची आपण फार आतुरतेने वाट पाहत असतो. फणसाची गोड मधुर, रसाळ गरे खाण्यासारखे दुसरे सुख नाही.
फणसाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, एक कापा आणि एक बरका. पण बाजारात गेल्यावर कापा आणि बरका फणस ओळखण्यात अनेकदा सगळ्यांचा गोंधळ उडतो. दोन्ही फणसाचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे आणि त्याची चव व उपयोगी वेगवेगळ्या आहेत.
बाजारातून फणस विकत घेताना कापा आणि बरका फणस यात गल्लत होऊ नये.
यासाठी कापा आणि बरका फणस यातील फरक कसा ओळखावा यासाठी काहीखास टिप्स पाहूयात.
फणसाला बाहेरच्या बाजूने काट्याची आवरण असते कापा फणसावरील काटे हे थोडे बस्के आणि पसरट असतात. याउलट बारक्या फणसावरील काटे हे थोडे टोकदार आणि उभे असतात फणस हातात घेतल्यावर ते हाताला अक्षरशः टोचतात.
कापा फणसाचे गरे हे घट्ट खोबऱ्यासारखे थोडे कडक असतात बरक्या फणसाचे गरे मऊ लुसलुशीत आणि थोडे गिळगिळीत असतात.
कापा फणसाचे गरे हे सहजपणे सालीपासून अगदी पटकन वेगळे करता येतात. बरका फणसाचे गरे चिकट आणि मऊ असल्याने ते सालीपासून वेगळे करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते.
कापा फणस भाजीसाठी किंवा सुके फणसाचे चिप्स बनवण्यासाठी जास्त वापरला जातो. याच्या घरांना एक विशिष्ट प्रकारचा कुरकुरीतपणा असतो. बर का फणस सहसा पिकल्यावरच खाल्ला जातो. याचा वापर अनेकदा जाम मिल्क शेक किंवा इतर गोड पदार्थांमध्ये केला जातो.
कापा फणसाचा जास्त वास येत नाही किंवा खूप सोमवार येतो. याउलट, बरका फणस पिकल्यावर खूप गोड आणि तीव्र सुगंध देतो. हा वास लांबूनही ओळखता येतो. कापा फणस दाबून पाहिल्यास घट्ट आणि ठळक लागतो, तो लवकर नरम पडत नाही. बरका फणस दाबून पाहिल्यास मऊ आणि लवचिक लागतो. तो लवकर नरम पडतो.