५९ व्या वर्षी सलमान खानचा दमदार लूक; वजन घटवून आर्मी स्टाईलमध्ये तयार

५९ व्या वर्षी सलमान खानचा दमदार लूक; वजन घटवून आर्मी स्टाईलमध्ये तयार
  • Positive News
  • जून 11 2025

Share on  

५९ व्या वर्षी सलमान खानचा दमदार लूक; वजन घटवून आर्मी स्टाईलमध्ये तयार

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) अनेक महिन्यांपासून वाढलेलं पोट, सुजलेला चेहरा अशा लूकमध्ये दिसायचा. सलमानचं वजन कमालीचं वाढलेलं होतं. पण आता नुकताच त्याचा नवीन लूक समोर आला आहे. यामध्ये तो अगदीच बारीक  झालेला दिसत आहे. तसंच त्याने आर्मी कटही केलेला दिसतोय. फोटोमध्ये त्याचे बायसेप्स पाहून तर अनेकांना विश्वासच बसत नाहीए. सलमानसोबत काही सिनेमांमध्ये दिसलेल्या साजन सिंहने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 

'रेस ३', 'भारत' या सिनेमांमध्ये सलमान खानसोबत दिसलेला अभिनेता साजन सिंहने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याचं कुटुंबीय आहे. सर्वांनी सलमान खानसोबत  त्याच्या घरी फोटो काढला आहे. फोटोत सलमान छोट्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे. तो कॅमेऱ्याकडे पाहत हसत सर्वांसोबत पोज देत आहे. काळा व्ही नेक शक्ट, ब्लू पँट अशा लूकमध्ये तो दिसत आहे. यात त्याचं वजन कमालीचं घटलेलं दिसत आहे. त्याचा चेहराही एकदम आत गेल्यासारखा वाटत आहे. ५९ वर्षीय सलमानचं हे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही अवाक झालेत. 

सलमान खान आगामी सिनेमात सैन्य अधिकाऱ्याची भूमिका करणार आहे. गलवान घाटीत भारत विरुद्ध चीनमध्ये झालेल्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे. याच सिनेमाच्या तयारीसाठी सलमानने वजन कमी केल्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या