राइनोफेस्ट २०२५ : नाशिकमध्ये वैद्यकीय कौशल्याचा जल्लोष – सहा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया!

राइनोफेस्ट २०२५ : नाशिकमध्ये वैद्यकीय कौशल्याचा जल्लोष – सहा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया!
  • Positive News
  • ऑक्टोबर 22 2025

Share on  

 राइनोफेस्ट २०२५ : नाशिकमध्ये वैद्यकीय कौशल्याचा जल्लोष – सहा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया!

नाशिक (प्रतिनिधी) – डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे ‘राइनोफेस्ट २०२५’ या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत देशभरातील ईएनटी आणि प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञांनी उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी लाइव्ह कॅडॅव्हेरिक नोज डिसेक्शन चे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी लाइव्ह राइनोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्व शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी झाल्या असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यशाळेचे मुख्य ऑपरेटिंग सर्जन अमरावतीचे प्रसिद्ध राइनोप्लास्टी सर्जन डॉ. क्षितिज पाटील होते. तसेच ठाण्याच्या डॉ. ज्योत्सना जागताप, मुंबईचे प्लास्टिक सर्जन डॉ. कपिल अग्रवाल आणि नाशिकचे डॉ. राजेंद्र नेहेते यांनी उत्कृष्ट शस्त्रक्रिया सादर केल्या.
कार्यशाळेसाठी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस  ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर  लोखंडे, डीन डाॅ. सुधीर भामरे यांचे अनमोल  मार्गदर्शन  व सहकार्य  लाभले.

कार्यक्रमाचे आयोजन ईएनटी विभागप्रमुख आणि अध्यक्षा डॉ. श्रीया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. आयोजक सचिव डॉ. रुषिका पटेल आणि डॉ. महेश निकम यांनी प्रभावी समन्वय साधून कार्यक्रम सुरळीत पार पाडला.

‘राइनोफेस्ट २०२५’ ने वैद्यकीय शिक्षण आणि शस्त्रक्रिया कौशल्याचा नवा आदर्श निर्माण केला असून, सहभागी डॉक्टर आणि रुग्ण दोघांच्याही समाधानाचा जल्लोष या कार्यशाळेत अनुभवायला मिळाला.
 

संबंधित बातम्या