आजकाल हेल्दी ड्रिंकचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. सेंद्रिय सोल्टझर, व्हिटॅमिनयुक्त पाणी आणि आता नवीन भर – प्रीबायोटिक सोडा! सोशल मीडियावर तुम्ही हे पेय पाहिलेच असेल. पण हे खरंच पचनासाठी फायदेशीर आहे का? आणि त्यामध्ये नेमकं काय असतं?
प्रीबायोटिक सोडा म्हणजे काय?
प्रीबायोटिक सोडा म्हणजे असं पेय, ज्यामध्ये पचन न होणारे आहारातील फायबर्स असतात. यांना प्रीबायोटिक्स म्हणतात. हे फायबर्स आपल्या शरीरात न पचता आतड्यांतील चांगल्या जिवाणूंना खाद्य म्हणून काम करतात.
प्रीबायोटिक पेयांमध्ये मुख्यतः इन्युलिन नावाचा फायबर असतो, जो नैसर्गिकरित्या अॅगावे किंवा चिकोरी रूटमधून मिळतो. इन्युलिन हा सोल्युबल फायबर असल्याने पाण्यात सहज मिसळतो, त्यामुळे पेयामध्ये त्याची चव किंवा गंध जाणवत नाही.
फायबर: २ ते ९ ग्रॅम प्रति कॅन (ब्रँडनुसार बदलते)
साखर: बहुतांश वेळा ५ ग्रॅमपेक्षा कमी
गोडवा: स्टीविया किंवा नैसर्गिक फ्लेवर्स वापरले जातात
अॅपल सायडर व्हिनेगर: काही प्रमाणात असतो, पण आरोग्यदायी परिणाम होत असल्याचे शास्त्रीय पुरावे मर्यादित
चांगल्या जिवाणूंची वाढ व वाईट बॅक्टेरियाची संख्या कमी
भूक कमी लागणे आणि जास्त वेळ तृप्त वाटणे
अनहेल्दी फूड क्रेविंग्स कमी होणे
Type 2 डायबेटीसमध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स कमी होण्याची शक्यता
अत्यधिक फायबर घेणे हे काहीवेळा पचनास त्रासदायक ठरू शकते. संभाव्य त्रास:
गॅस, फुगवटा, मळमळ
अतिसार किंवा पोटदुखी
विशेषतः ज्यांना IBS, IBD, क्रॉनिक बद्धकोष्ठता असे त्रास आहेत, त्यांनी इन्युलिनयुक्त प्रोडक्ट्सपासून सावध राहावे
नाही. आहारतज्ञ झुम्पानो सांगतात की प्रीबायोटिक सोडा ही एक आवडती हेल्दी ट्रीट समजावी, पण त्यावर दररोजच्या फायबरसाठी अवलंबून राहू नये.
पचनासाठी खरोखर फायदा हवा असेल, तर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि नैसर्गिक आहारातील फायबरचा समावेश हा सर्वोत्तम मार्ग आहे.
ही माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य माहितीच्या उद्देशाने दिली आहे. प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती आणि आरोग्याची स्थिती वेगवेगळी असते. प्रीबायोटिक सोडा किंवा कोणतेही आहारपूरक पेय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे उचित ठरेल, विशेषतः जर तुम्हाला पाचनसंबंधित आजार किंवा साखरेचा त्रास असेल.