पंढरपूर : प्रॅक्टिस राईडचा भव्य शुभारंभ — नाशिकच्या सायकलपटूंचा उत्साह दांडगा!*

पंढरपूर : प्रॅक्टिस राईडचा भव्य शुभारंभ — नाशिकच्या सायकलपटूंचा उत्साह दांडगा!*
  • Positive News
  • मे 19 2025

Share on  

पंढरपूर : प्रॅक्टिस राईडचा भव्य शुभारंभ — नाशिकच्या सायकलपटूंचा उत्साह दांडगा!*

नाशिक, प्रतिनिधी — *सॅटर्डे संडे ग्रुप, नाशिक* तर्फे आयोजित केलेल्या *पंढरपूर प्रॅक्टिस राईड*चा शुभारंभ रविवार 18 मे सकाळी सहा वाजता अनंत कान्हेरे मैदान येथून मोठ्या उत्साहात करण्यात आला. या राईडसाठी अनेक मान्यवर सायकलपटूंनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला. नासिक ते पंढरपूर 360 किलोमीटर सायकलिंग वारी 20 जून ते 22 जून सगळे सॅटर्डे संडे ची सायकल लिस्ट करणार आहेत. याची प्रॅक्टिस म्हणून दररोज प्रत्येक सायकलिस्ट 25 किलोमीटर पेक्षा जास्त सायकलिंग करत आहे. मागच्या महिन्यामध्ये संभाजी महाराज जयंती निमित्त सर्व सॅटर्डे संडेच्या 350 सायकलिस्टने 1,93,000 किलोमीटर सायकलिंग केले. आता दररोज कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर सायकलिंग प्रत्येक सायकल लिस्ट करत आहे.
सकाळी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल असे विठोबा रखुमाईच्या गजरामध्ये प्रॅक्टिस साईडला सुरुवात झाली. अनंत कान्हेरे पासून बिटको पॉईंट येथे सर्व सायकल ईस्ट पोहोचले. टोटल 35 किलोमीटर सायकलिंग चे काल आयोजन करण्यात आले होते.
बिटको पॉईंट येथे वारुंगसे दादा, उत्तमराव निकम, विजय भावसार, दत्तू  टिळे, बाबूदादा ताजनपुरे आणि इतर सायकलप्रेमींनी एकत्र येऊन पुढील प्रवासास सुरुवात केली. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि जोश स्पष्टपणे दिसत होता.

राईड दरम्यान विश्वास लॉन्स येथे पोलीस उपआयुक्त श्री. चव्हाण सर यांची विशेष भेट झाली. त्यांनी सायकलपटूंना मार्गदर्शन करत पुढील वारीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. विश्वास लॉन्सचे सर्वेसर्वा श्री. विश्वास ठाकूर यांनीही उपस्थित सायकलपटूंना प्रोत्साहन देत त्यांचे खुले दिलाने कौतुक केले.

या कार्यक्रमात विनायक रानडे, विश्वास ठाकूर आणि आयुक्त चव्हाण सर यांनी पंढरपूर वारीसाठी सहभागी सर्व सायकल लिस्टना शुभेच्छा दिल्या. विशेषतः पार्थ शिंदे यांनी दिलेल्या घोषणा आणि उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण प्रेरणादायी झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेत डॉ. संदीप भानोसे, शिवाजी पारधी, माधवराव पवार, नलिनी कड मॅडम, मेघा सोनजे, अपर्णा भोगावकर, अरुणा राणे, तृप्तीदा काटकर यांचा मोलाचा सहभाग लाभला.

सर्व सायकलपटूंना विजय दादा भावसार यांनी दिलेला गरमागरम चहा हा त्यांच्या आपुलकीचा आणि प्रेमाचा प्रतीक ठरला. त्यांच्या या आत्मीयतेबद्दल सॅटर्डे संडे ग्रुप तर्फे त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

या प्रेरणादायी प्रॅक्टिस राईडने नाशिकच्या सायकल चळवळीला नवे बळ दिले असून, पंढरपूर वारीसाठीचा उत्साह आणखी वाढविला आहे. उपस्थित सर्व सायकलपटूंना सॅटर्डे संडे ग्रुप, नाशिक तर्फे मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा!

संबंधित बातम्या