मविप्रच्या करिअर सेंटरतर्फे ३०० हून अधिक तरुणांना नोकरीच्या संधी..!
---------------------------
राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये नोकरी मेळाव्यासाठी नोंदणी सुरू
---------------------------
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या सीआयआय - मॉडेल करिअर सेंटर (एमसीसी) मध्ये भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात इयत्ता दहावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांना सहभाग घेता येणार असून, तब्बल ३०० हून अधिक नोकरीच्या संधी यात उपलब्ध होणार आहेत.
भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि सीआयआय (भारतीय उद्योग महासंघ) यांच्या संयुक्त पुढाकाराने, तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी ई२ई (शिक्षण ते रोजगार) प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयातील सीआयआय - मॉडेल करिअर सेंटरमध्ये शनिवार दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून, खाली दिलेल्या लिंकवर अथवा क्यू आर कोडद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन मविप्रच्या सीआयआय - मॉडेल करिअर सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------------------
कोट
मविप्र संस्था सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. शिक्षणाबरोबरच तरुणाईला त्या शिक्षणाच्या बळावर नोकरीची चांगली संधी मिळावी, त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटावा, यासाठी संस्थेने ‘करिअर सेंटर’ सुरु केले आहे. या सेंटरमार्फत गेल्या महिन्यात झालेल्या मेळाव्यात तब्बल १,८०० उमेदवारांना चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी प्राप्त झाली. या मेळाव्यातदेखील सुमारे ३०० हून अधिक उमेदवारांना नोकरीची संधी असून, जास्तीत जास्त तरुणांनी नोंदणी करून या संधीचे सोने करावे.
- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र, नाशिक.
-----------------------------------
चौकट
मोफत मिळणार ‘कौशल्य विकास प्रशिक्षण’
* ७ हून अधिक आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग * विविध क्षेत्रांतील ३००+ नोकरीच्या संधी * सर्व पात्र उमेदवारांसाठी मोफत सहभाग * मोफत उच्च तंत्रज्ञान कौशल्य विकास प्रशिक्षण (७/१५/९० दिवसांचे अभ्यासक्रम) * प्रकल्पांतर्गत साप्ताहिक नोकरी मेळावे
-----------------------------------
महत्वाचे...
पात्रता : १०वी/१२वी/आयटीआय/पदवीधर
ठिकाण : सेमिनार हॉल, मविप्र समाजाचे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक, गंगापूर रोड, नाशिक.
दिनांक : ०८ नोव्हेंबर २०२५. वेळ : सकाळी १० ते दुपारी १
संपर्क : समन्वयक सागर चौधरी - 9552797210.
-----------------------------------
...येथे करा नोंदणी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSceQ-uiexVqob-xNtcOMIeykx6nENuMw6p-FFwud-W1qrh9Kw/viewform?usp=header
---------------------------------------
नोंदणीसाठी सोबत क्यू आर कोड दिलेला आहे