महाकुंभमेळ्याचे आयोजन         

 महाकुंभमेळ्याचे आयोजन         
  • Positive News
  • मे 9 2026

Share on  

 महाकुंभमेळ्याचे आयोजन           

           
*नाशिक ; पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलश बाहेर पडले होते. तेव्हा त्याचे काही थेंब हे प्रयागराज,हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे पडले. त्यामुळे या चार ठिकाणीच कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. महाकुंभमेळ्यात शाही स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व असते.या वेळी प्रत्येक आखाडा आपल्या शाही ताफ्यासह संगमाच्या काठावर नाचतो, गातो आणि संगमाच्या काठावर पोहोचून आणि स्नान करतो.
*प्रयागराज:* प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन हे जेव्हा गुरु ग्रह वृषभ राशीत असतो त्यावेळी केले जाते.
सध्या गुरु याच राशीत आहे.
*हरिद्वार:* सूर्य मेष राशीत आणि गुरु ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत असताना हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
 *नाशिक:* गुरु आणि सूर्य हे दोन्ही ग्रह सिंह राशीत असतात,तेव्हा महाराष्ट्रातील नाशिक येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
*उज्जैन:* सूर्य ग्रह मेष राशीमध्ये आणि गुरु ग्रह सिंह राशीमध्ये असताना, सूर्य देवाचे राशीत असताना उज्जैनमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
 ???? *कुंभ आणि महाकुंभ यातील फरक जाणून घ्या* :
उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार आणि नाशिक येथे दर तीन वर्षांनी एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार आणि प्रयागराजच्या काठावर ६ वर्षातून एकदा अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो. तर पूर्ण कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा आयोजित केला जातो, जो प्रयागराजमध्ये होतो. प्रत्येक १२ कुंभमेळे पूर्ण झाल्यानंतर एक महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते, याआधी २०१३ साली प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते.


*या वर्षी २०२६ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा नाशिक<>त्र्यंबकेश्वर*
*सुरुवात*: शनिवार,३१ ऑक्टोबर २०२६ -दुपारी १३.०२ वाजता ~ रामकुंड पंचवटी येथे ध्वजारोहण.
*समाप्ती:* २४ जुलै २०२८~ ध्वजावतरण 

म्हणजे तब्बल *२२ महिने* चालणारा कुंभमेळा आहे,याला *"त्रिखंडी सिंहस्थ"* म्हणतात कारण गुरू ग्रह या काळात ३ वेळा राशी बदलणार आहे. 

*मुख्य अमृतस्नान/शाही स्नानाच्या तारखा २०२७*
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दोन्हीकडे एकाच दिवशी:

*१.)पहिले अमृतस्नान:* सोमवार, २ऑगस्ट २०२७ ~ आषाढ सोमवती अमावस्या
*२.)दुसरे अमृतस्नान~ महाकुंभस्नान:* मंगळवार,३१  ऑगस्ट २०२७ श्रावण अमावस्या
*३.)तिसरे अमृतस्नान:*
    *नाशिक:* शनिवार,११ सप्टेंबर २०२७.
   *त्र्यंबकेश्वर:* शनिवार,१२सप्टेंबर २०२७.
*इतर ????महत्वाच्या????तारखा*
*साधुग्राम ध्वजारोहण*: शनिवार,२४ जुलै २०२७
*नगर प्रदक्षिणा:* गुरुवार, २९जुलै २०२७
*एकूण पर्वस्नान:* नाशिकमध्ये ४४ व त्र्यंबकेश्वरमध्ये ५३ मुहूर्त (1087b440)

*या वर्षीचे वैशिष्ट्य*
सामान्यतः सिंहस्थ १३ महिन्यांचा असतो,पण यंदा *गुरू २ वेळा वक्री* होणार असल्याने *२२ महिन्यांचा* झाला.*७१* वर्षांनी असा *त्रिखंडी योग* आला आहे.
           *ll????शुभम्????भवतु????ll*
 

संबंधित बातम्या