चातुर्मासांत स्तोत्रपठण, सद्ग्रंथलेखनसेवा याबरोबरच दानाचे विशेष महत्त्व आहे. त्याची थोडी माहिती.......
१) *स्वस्तिक:-* देवासमोर हळदी कुंकाचे स्वस्तिक काढावे ... सांगतेला उद्यापनाला हळदीकुंकू करंडा सुवासिनीला देऊ शकता .
२) *नित्यदान:-* दररोज देवासमोर एक धान्य व दक्षिणा ठेवावी, याला नित्यदान म्हणतात किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेऊन सत्पात्री किंवा मंदिरात दान द्यावे . उद्यापनाला सत्पात्री, सात्विक व्यक्तीला जेवायला बोलावावे किंवा शिधा द्यावा.
३) *पृथ्वीपूजा :*.... रोज देवघरात जमिनीला पाणी लावून, पुसून स्वस्तिक , लक्ष्मीपाऊल काढून , हळदीकुंकू , माळा, वस्त्र वाहून दूधसाखर दाखवून ओटी भरावी . उद्यापनाला आईला साडी नेसवावी .. पृथ्वी म्हणजे आई मानून आपल्या आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे, 'समुद्रवसने देवी' श्लोक म्हणत पूजा करावी.
४) *बाळकृष्ण पूजन:-* तुळशीमध्ये श्री बाळकृष्ण ठेऊन जोडीने पूजा करावी......व परत देवघरात आणून ठेवावे. यांस दाम्पत्यपूजा म्हणतात. दररोज करावे. उद्यापनाला यथानुशक्ती वस्त्र देऊन मेहूण जेवू घालू शकता.
५) *पंचामृताने अभिषेक* श्रीकृष्णाला रोज पूजा- अभिषेक करावी किंवा दर द्वादाशीला पंचामृत घालून पूजा करून मध, तूप, दूध, दही, साखर दान करावे किंवा लोण्यात कृष्ण ठेऊन पूजा करून लोणी दान करावे .
६) *सुवासिनी सन्मान* दर द्वादशीला सुवासिनीला विडा, दक्षिणा, दूध, गजरा देऊन ओटी भरावी किंवा दर द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भराव्या किंवा दर द्वादशीला साडी / सूपवाण द्यावे.
७) *तुळशी अलंकारिक पूजा :* दर द्वादशीला तुळशीला सर्व अलंकार( नथ, जोडवे, बांगड्या, मंगळसूत्र) घालून ओटी भरावी, पूजा करून उद्यापनाला तेच दान द्यावे.
८) *मेहुण भोजन:* दर द्वादशीस मेहूण जेवू घालू शकता .. उद्यापनाला चातुर्मासातील सर्व द्वादशांचे( नऊ) मेहूण एकत्र जेवायला बोलावून यथानुशक्ती वस्त्र देऊन ओटी भरणे.
९) *तुळशी पत्र अर्चन:* दर एकादशीला देवाला १०८,१००८ तुळशी अर्चन करू शकता म्हणजे २४ किंवा १०८ किंवा १००८ तुळशी पत्र अर्पण करने
१०) *पंचामृत चातुर्मास:* ..... दर महिना पंचामृतातील एक घटक सोडायचे जसे की प्रथम महिन्यात दूध, नंतर दही, नंतर तूप आणि शेवटी मध +साखर आणि ते शेवटी दान करायचे.
११) *लक्ष पुष्पार्चन* ... पारिजात किंवा इतर सुवासिक लक्ष (एक हजार) फुले भगवान विष्णू ना अर्पण करू शकता.
१२) *गौ-पूजन :* रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा करा गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गाईची करावी. गोग्रास द्यावे . उद्यापनाला यथानुशक्ती गोदान करावे.
१३) *शिधा दान:* दर द्वादाशीला देवासमोर शिधा काढून ठेवावे व संकल्प करून सत्पात्री द्यावे.
१४) *नित्य देवदर्शन* ..... मंदिरात जाऊन दर्शन, प्रदक्षिणा नियम करू शकता.
१५) *दीपदान :* दररोज तुपाचा दिवा लावायचा. दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समयी दान करणे, मंदिरात तेल दान देणे .
१६) *लक्ष संकल्प :* लक्ष वाती करणे, लावणे किंवा देणे, लक्ष ओटी भरणे, लक्ष नमस्कार, किंवा लक्ष जप करणे असे संकल्प करू शकता.
१७) *पुण्यवृक्ष अर्चन :* दररोज तुळशीला, औदुबर, बेल , आवळा प्रदक्षिणा... (११, २१, किंवा १०८ असे घालू शकता.)
१८) *तुळशी पूजा तबकदान...* म्हणजे तुळशी पूजेला ज्या वस्तू नेतो त्या वस्तू दान द्यावे. हे दर द्वादशी किंवा एकदा करू शकता .(निरंजन ,कलश, करंडा, पूजेचे ताम्हण वगैरे.)
१९) *गुप्तदान* ... या चार महिन्यातील द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती, पोळे, सोने, चांदी किंवा पैसे-कॉइन अथवा नोट लपवून ( गुप्त ठेवून) संकल्प करून, देवाला दाखवून दान द्यावे. देणाऱ्याला काय दिले हे सांगू नये.
२१) *सुवासीनिस दान* सुवासिनीला साडी किंवा अलंकारादि वस्तू इत्यादी दान करू शकतो .
मला माहिती असलेले, वाचलेले व्रत लिहून पाठवले आहे. ज्याला शक्य आहे त्यांनी संकल्प सोडून यथाशक्ती हे व्रताचरण
भगवत्प्रीत्यर्थ करावे.