आता मुलांना शाळांमध्येच शिकवला जाणार एआय आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग; एनसीईआरटीचा मोठा निर्णय

आता मुलांना शाळांमध्येच शिकवला जाणार एआय आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग; एनसीईआरटीचा मोठा निर्णय
  • Positive News
  • ऑक्टोबर 27 2026

Share on  

आता मुलांना शाळांमध्येच शिकवला जाणार एआय आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग; एनसीईआरटीचा मोठा निर्णय


 तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात शाळकरी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनवण्यासाठी एनसीईआरटीने (NCERT) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'कॉम्प्युटेशनल थिंकिंग' (सीटी) आणि 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (एआय) या विषयांवर आधारित २० तासांचा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. 

हा अभ्यासक्रम एनसीईआरटीने आयआयटी मद्रास आणि आयआयटी जोधपूर यांच्या सहकार्याने विकसित केला आहे.पाच युनिट्समध्ये विभागलेला हा अभ्यासक्रम पूर्णपणे प्रत्यक्ष कृती आणि अनुभवावर आधारित आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना एआयचे स्वरूप, त्याचे फायदे, लाभांचे व तोट्यांचे पैलू आणि तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर करण्याचे धडे दिले जाणार आहेत. या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या 'व्हेन एआय गेट्स इट रँग' या विशेष घटकाद्वारे विद्यार्थ्यांना डीपफेक आणि चुकीची माहिती ओळखण्याची सत्य पडताळणी पद्धत शिकवली जाणार आहे.

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आधार, पॅन आणि पासवर्ड यांसारखी कोणतीही संवेदनशील वैयक्तिक माहिती कोणत्याही एआय साधनांमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर शेअर करू नये, असा स्पष्ट व कडक इशारा एनसीईआरटीकडून देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या