उद्योजकतेला व स्टार्टअप्सना नवसंजीवनी!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे 'महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी'ची '5वी सर्वसाधारण बैठक' संपन्न झाली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरण 2025 हे समाजात वैविध्यपूर्ण बदल घडविणारे असून उद्योजकतेला व स्टार्टअप्सना नवसंजीवनी देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचना :
राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणांसाठी आलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी करावी
स्टार्टअप्सच्या मार्गदर्शनासाठी सक्षम यंत्रणा उभारावी
इतर राज्यांमध्ये स्टार्टअप वाढीसाठी प्रयत्न होत असताना महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी कायम राखावी
महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारणीसाठी गतीने कार्यवाही करत हा प्रकल्प कालबद्ध नियोजनानुसार पूर्ण करावा
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा व संबंधित अधिकारी उपस्थित होते.