नवरात्री स्पेशल फॅशन गाईड – डांडिया नाइटसाठी तुमचा लूक कसा उठून दिसेल 

 नवरात्री स्पेशल फॅशन गाईड – डांडिया नाइटसाठी तुमचा लूक कसा उठून दिसेल 
  • Positive News
  • सप्टेंबर 24 2025

Share on  

 नवरात्री स्पेशल फॅशन गाईड – डांडिया नाइटसाठी तुमचा लूक कसा उठून दिसेल 

नवरात्री म्हटलं की रंगीबेरंगी पोशाख, थिरकणारे डांडिया, पारंपरिक दागिने आणि आनंदी वातावरण! 
या उत्सवात सगळ्यांना वेगळं आणि खास दिसायचं असतं. म्हणूनच डांडिया नाइटसाठी काही सोपे पण आकर्षक फॅशन टिप्स तुमच्यासाठी –

 स्टायलिश पोशाख कल्पना

  • कुर्ती आणि पलाझो – हलक्या कापडातील रंगीत कुर्ती, त्यासोबत फुलदार किंवा प्रिंटेड पलाझो. जड बांगड्या व कानातले वापरा.

  • अनोख्या अॅनारकली सूट्स – फ्लेअर असलेले सूट्स नाचताना आरामदायी आणि आकर्षक दिसतात. मिररवर्क दागिन्यांसह जुळवा.

  • कॉटन / बनारसी साडी किंवा लहेंगा – पीच, मिंट ग्रीन, लॅव्हेंडर रंगातील साध्या पण देखण्या साड्या. गजरा व हलके दागिने घाला.

  • कलरफुल लहेंगा-चोळी – मिररवर्क किंवा एम्ब्रॉयडरी असलेले रॉयल ब्लू, गुलाबी, पिवळ्या रंगातील लहेंगा-चोळी सध्या ट्रेंडमध्ये.

  • ब्राईट साड्या – हलके डिझाईन व गडद रंगांच्या साड्या. केसांत वेणी किंवा लो बन, पारंपरिक नथ आणि सिंदूरी बिंदी लूकला वेगळा उठाव देतात.

  • मिररवर्क घागरा – मॅरून-गोल्ड किंवा रॉयल ब्लू कॉम्बिनेशनमधील घागरा-चोळी. केसात गजरा घालून पारंपरिक दागिने वापरा.

  • फ्युजन गाऊन – आधुनिक गाऊनसोबत पारंपरिक दुपट्टा. हलके झरीवर्क गाऊन कमी दागिन्यांसह घातले तर स्टायलिश आणि सोयीस्कर वाटते.

 मेकअप टिप्स

  • तेजस्वी पण हलका मेकअप करा.

  • आयलाइनर व काजळ वापरून डोळ्यांना आकर्षक लूक द्या.

  • लिपस्टिकसाठी गडद शेड्स – लाल, मॅजेंटा किंवा मरून उत्तम ठरतील.

 हेअरस्टाईल

  • साइड ब्रेड्स, लो बन किंवा मोकळे केस – तुमच्या पोशाखाशी जुळवून निवडा.

  • गजरा किंवा फ्लोरल हेअर अॅक्सेसरी वापरल्यास पारंपरिक लूक अधिक खुलतो.

 डिस्क्लेमर

वरील माहिती ही सर्वसाधारण फॅशन टिप्स स्वरूपात दिली आहे. व्यक्तीनुसार शैली, सोय व आवड वेगवेगळी असू शकते. कृपया आपल्या सोयीप्रमाणे आणि प्रसंगानुसार योग्य पर्याय निवडा.

संबंधित बातम्या