नाशिकरोड विभाग मराठा सेवा संघाची बैठक मोठ्या थाटामाटात उत्साहात संपन्न

नाशिकरोड विभाग मराठा सेवा संघाची बैठक मोठ्या थाटामाटात उत्साहात संपन्न
  • Positive News
  • नोव्हेंबर 19 2025

Share on  

नाशिकरोड विभाग मराठा सेवा संघाची बैठक मोठ्या थाटामाटात उत्साहात संपन्न


  अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा हद्दपार करण्यासाठी व उद्योग व्यवसायात एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन

नाशिकरोड :  मराठा सेवा संघाची बैठक मोठ्या थाटामाटात उत्साहात हॉटेल हरियाली येथे संपन्न झाली यावेळी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा यातून समाज मुक्त करण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
 कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पुजनांनी झाली. यावेळी सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली. 
कार्यक्रमाप्रसंगी मराठा सेवा संघाचे प्रदेश संघटक दीपक भदाणे,नाशिक रोड विभाग अध्यक्ष सुनील सोनवणे,नाशिक शहर उपाध्यक्ष शेखर पवार, सामाजिक कार्यकर्ते श्याम गोहाड,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष स्मिता शिंदे,माजी नगरसेविका कांता वराडे,अँड.सचिन चव्हाण,शिवव्याख्याते संदीप डुंबरे,मंगेश बोंडे,सागर सहाणे,किशोर ताजनपुरे,संदेश भागवत,उमेश गायकवाड,अक्षय देशमुख,अँड.अरविंद गायकवाड,चंद्रभान ताजनपुरे, ज्ञानेश्वर भोर,शिवनाथ थोरात,राहुल बोराडे,तनिष शिंदे,प्रशांत भवर, दुर्गादास तासकर,दिगंबर डबे,साईनाथ क्षिररसागर,संतोष शिंदे,प्रकाश डावखर, मच्छिंद्र ताजनपुरे,संजय चव्हाण,प्रशांत वराडे,नितीन पाटील,ज्ञानेश्वर भोर,नितीन देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाशिक रोड विभाग अध्यक्ष सुनील सोनवणे यांनी मराठा सेवा संघ नाशिक रोड विभागात सक्षम पुढे पुढे आणण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्याम गोहाड यांनी वेगवेगळ्या समस्यांच्या माध्यमातून समाज पुढे जात आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या भावनेतून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले.अँड.
सचिन चव्हाण यांनी बुवाबाजी यासह अंधश्रद्धेच्या नादी लागल्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे यासाठी प्रभावीपणे मराठा सेवा संघ विचारधारा पुढे आणण्यासाठी गरजेचे असल्याचे सांगितले.माजी नगरसेविका कांता वराडे यांनी महिलांच्या संघटनेसाठी संघटना संघटना करण्यासाठी आम्ही महिलांची एक चांगली फळी तयार करू यासाठी सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष स्मिता शिंदे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांना विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यप्रवण केले जात आहे.यासाठी आलेल्या सर्व उपस्थितांनी महिला वर्गाला पुढे आणावे जिजाऊंचे कार्य पुढे न्यावे असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक भदाणे यांनी समाजातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मराठा सेवा संघाने सातत्याने पुढाकार घेतला आहे. समाजातील अनिष्ट रूढींना हद्दपार करून एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी शेखर पवार यांनी विविध समाज घटकांच्या माध्यमातून येत्या काळात नाशिक रोड विभागाची संघटन बांधणी केली जाईल यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना उपस्थितांनी एकत्र करण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या