नागपूर  : 'निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायोडायव्हर्सिटी पार्क आवश्यक'

नागपूर  : 'निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायोडायव्हर्सिटी पार्क आवश्यक'
  • Positive News
  • मे 18 2025

Share on  

नागपूर  : 'निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायोडायव्हर्सिटी पार्क आवश्यक'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे, 'गोरेवाडा स्थानिक जैवविविधता उद्यान, निसर्ग संवाद आणि अनुभव केंद्रा'च्या सादरीकरणासंदर्भात बैठक संपन्न झाली.

निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील सुमारे 3 लाख स्केवर मीटर क्षेत्रावर प्रस्तावित बायोडायव्हर्सिटी पार्क एक उत्तम माध्यम ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याच्या निर्मितीसाठी लागणारा काही निधी शासनाकडून व काही निधी सीएसआरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

असा असेल बायोडायव्हर्सिटी पार्क

हा जैवविविधता पार्क पर्यावरणाच्या संवर्धनासह शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या तीन तत्त्वांवर उभारला जाईल. यात विद्यार्थ्यांना विविध संशोधनाची, शिक्षणाची संधी मिळेल. कृषी, विज्ञान, वन, जैवविविधता या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल. पूर्वापार चालत आलेली व या मातीत एकरुप असलेली विविध प्रकारची झाडी इथे लावली जाईल. सुमारे 150 पेक्षा अधिक बांबूच्या जातींचे या ठिकाणी संवर्धन केले जाईल.

आध्यात्मिक अनुभूतीसह या पार्कमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धनावर भर राहील. देवराई वन, नक्षत्र वन, राशी वन, औषधी वनस्पती संशोधन व संवर्धन, फुलपाखरु व काजवे असलेले वन, विविध मातींचे वैविध्य जपणारे दालन, पर्जन्यमापन, दिशाशास्त्र, योगा झोन, पीस झोन, फॅमिली झोन, मानसशास्त्र, आरोग्य या प्रमुख घटकांशी अंतर्मुख करणारा हा पार्क राहील.

या बैठकीस आ. संदीप जोशी, मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या