*माझिया मना… घे भरारी..... स्वतःलाही ऐकायला शिक*  :- हीलरअंजली जाधव.

*माझिया मना… घे भरारी..... स्वतःलाही ऐकायला शिक*  :- हीलरअंजली जाधव.
  • Positive News
  • एप्रिल 6 2026

Share on  

*माझिया मना… घे भरारी..... स्वतःलाही ऐकायला शिक*  :- हीलरअंजली जाधव.

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सतत इतरांसाठी जगत असतो…
कुटुंब, काम, जबाबदाऱ्या — या सगळ्यांमध्ये आपण इतके गुंतून जातो,
की स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायलाच विसरतो…
आपण इतरांना समजून घेण्याचा खूप प्रयत्न करतो,
पण त्या प्रक्रियेत स्वतःच्या भावनांना मात्र दाबून ठेवतो…
राग, दुःख, भीती, काळजी — या सगळ्या भावना मनात साठत राहतात,
आणि हळूहळू त्या आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम करायला लागतात…
खरं तर मन मोकळं करणं म्हणजे इतरांना विसरणं नाही…
तर स्वतः आणि इतर यांच्यात एक सुंदर संतुलन निर्माण करणं आहे…
स्वतःलाही ऐकणं, स्वतःलाही वेळ देणं,
आणि आपल्या भावनांना मान्यता देणं — हीसुद्धा तितकीच गरजेची गोष्ट आहे…
फक्त बाहेर फिरून येणं किंवा थोडा ब्रेक घेणं म्हणजे मोकळं होणं नाही…
तर आपल्या आवडी-निवडी जपणं,
छंदांना वेळ देणं,
आणि स्वतःची काळजी घेणं — हेच खरं self-care आहे…
जसं झाडाला फुलण्यासाठी सूर्यप्रकाश, पाणी आणि हवा लागते…
तसं आपल्या मनालाही प्रेम, समजून घेणं आणि मोकळेपणा हवा असतो…
अंधारात राहिलेलं झाड जसं कोमेजतं,
तसंच दडपलेल्या भावनांनी मनही हळूहळू कोरडं होतं…
म्हणूनच, स्वतःला थोडंसं मोकळं होऊ दे…
स्वतःसाठी थोडा वेळ काढ…
आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणात स्वतःला जाणून घे…
राग, आनंद, समाधान, काळजी, दुःख, भीती —
या सगळ्या भावना आपल्या जीवनाचा एक भाग आहेत…
त्यांना दूर ढकलण्यापेक्षा,
त्यांना स्वीकारून त्यांच्याशी मैत्री करणं हेच खरं healing आहे…
जेव्हा आपण आपल्या भावनांना प्रेमाने स्वीकारतो,
तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतःशी जोडले जातो…
आणि तेव्हाच आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने शांती, समाधान आणि आनंद निर्माण होतो… ????

संबंधित बातम्या