“खासदार आपल्या भेटीला – जनता दरबार” कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांचा थेट जनसंपर्क

 “खासदार आपल्या भेटीला – जनता दरबार” कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांचा थेट जनसंपर्क
  • Positive News
  • जून 12 2025

Share on  

 “खासदार आपल्या भेटीला – जनता दरबार” कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांचा थेट जनसंपर्क

ठाणे – कळवा येथील आई तुळजाभवानी मंदिर, न्यू कळवा हायस्कूल येथे "खासदार आपल्या भेटीला – जनता दरबार" या उपक्रमाअंतर्गत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. या दरम्यान विविध भागांतील नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी आणि सूचना थेट खासदारांसमोर मांडल्या.

रस्त्यांची दुरवस्था, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण संस्था, ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी, महिलांचे प्रश्न तसेच तरुणांशी संबंधित रोजगार व प्रशिक्षण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. श्री. शिंदे यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमपूर्वक ऐकले आणि समस्यांचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

काही तातडीच्या विषयांवर त्यांनी संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून त्वरित कार्यवाही करण्यास सांगितले. तसेच काही निवेदनांबाबत नियोजनबद्ध पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, अनेकांनी खासदार शिंदे यांच्या या थेट संवाद उपक्रमाचे स्वागत केले. जनता दरबारामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा अधिक बळकट झाला आहे.

 

 

संबंधित बातम्या