नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल अंतर्गत किम्स कड्डल्स विभागाच्या वतीने मातृत्व दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नवमाता, पालक आणि बालकांच्या उपस्थितीत विविध मनोरंजनात्मक उपक्रम, रॅम्प वॉक तसेच संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास , डॉ प्रार्थना नगरकर , डॉ प्रणिता संघवी , डॉ सोनाली म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. प्रणिता संघवी यांनी सांगितले की, “आई होण्याचा प्रवास हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि भावनिक क्षण असतो. किम्स कड्डल्समध्ये प्रत्येक माता आणि नवजात बाळाला सुरक्षित, संवेदनशील आणि वैयक्तिक काळजी देण्यावर आमचा नेहमीच भर राहिला आहे.”
तसेच त्यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षांतकिम्स कड्डल्स मध्ये ३०० हून अधिक बालकांचा जन्म झाला असून, हे पालकांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
मातृत्व दिनानिमित्त मातांसाठी विशेष रॅम्प वॉक, खेळ व संवादात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपस्थित मातांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी डॉ. प्रार्थना नगरकर यांनी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक अस्सिटेड गायनेकॉलॉजिस्ट सर्जरी (Robotic-Assisted Gynecologic Surgery ) सेवा सुरू करण्यात आल्याची घोषणा केली. फायब्रॉईड, ओव्हेरियन सिस्ट तसेच इतर स्त्रीरोगांवरील उपचार आता या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अधिक अचूक, कमी वेदनादायी आणि जलद रिकव्हरीसह उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच सामान्य प्रसूती (Normal Delivery) आणि सिझेरियन प्रसूती (C-Section) यांचे शुल्क समान ठेवण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला. आई व बाळाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वैद्यकीय गरजेनुसारच प्रसूतीचा निर्णय घेतला जातो, असे स्पष्ट करण्यात आले.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे या उद्देशाने हॉस्पिटलतर्फे ₹९९९ मध्ये विशेष वुमन्स वेलनेस पॅकेज सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचा समारोप आनंददायी वातावरणात झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय, नर्सिंग आणि प्रशासकीय विभागाने विशेष परिश्रम घेतले.