वस्त्रोद्योगामध्ये सौर ऊर्जेच्या वापराला गती; सहकारी सूतगिरण्यांसाठी धोरणात्मक निर्णय!

वस्त्रोद्योगामध्ये सौर ऊर्जेच्या वापराला गती; सहकारी सूतगिरण्यांसाठी धोरणात्मक निर्णय!
  • Positive News
  • जुलै 27 2025

Share on  

वस्त्रोद्योगामध्ये सौर ऊर्जेच्या वापराला गती; सहकारी सूतगिरण्यांसाठी धोरणात्मक निर्णय!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वस्त्रोद्योग क्षेत्राच्या व्यापक विकासासाठी आणि सहकारी सूतगिरण्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले की, सामाजिक न्याय, आदिवासी विकास व इतर बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी एकसमान निकष निश्चित करावेत. तसेच संबंधित विभागांनी त्यांच्या गरजेनुसार स्वतंत्र तरतूद करावी.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले इतर निर्देश : 
 सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी वस्त्रोद्योग व ऊर्जा विभागाची समिती स्थापन करण्याचे निर्देश
 सहकारी सूतगिरण्यांना प्रति चाती ₹5000 प्रमाणे द्यावयाच्या कर्जावरील व्याज अनुदान योजनेस मुदतवाढ देताना यामध्ये आधुनिकीकरण आणि श्रेणीकरण करण्याचे निर्देश
 राष्ट्रीय वस्त्र महामंडळाच्या अंतर्गत बंद असलेल्या सूतगिरण्या पुन्हा सुरू करण्यासाठी अहवाल तयार करावा व त्याआधारे केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश
 एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023–28 मध्ये आवश्यक सुधारणा करणे 
 सहकारी सूतगिरण्या व सहकारी यंत्रमाग संस्थाकडील शासकीय देणी वसुलीबाबत धोरण तयार करण्यात करण्याचे निर्देश
 राज्यातील सर्व यंत्रमागांची नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश

पुणे येथील रेशीम संचालनालयाच्या वापरात असलेल्या इमारतीच्या दुरुस्तीकरिता महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' घेण्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याची सूचना देखील यावेळी करण्यात आली.

यावेळी आढावा घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण विषय : 
 नवीन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ निर्माण करणे
 वस्त्रोद्योग आयुक्तालय आणि रेशीम संचालनालयाचे विलीनीकरण करून वस्त्रोद्योग व रेशीम आयुक्तालयाची निर्मिती करणे
 सहकारी सूतगिरण्यांकडील अतिरिक्त जमीन विक्रीस परवानगी देण्याबाबतची योजना तयार करणे
 सूतगिरण्यांना पुनर्वसन कर्ज देण्यासाठी नवीन योजना तसेच सूतगिरण्या भाडेपट्टीवर देण्यासाठी योजना तयार करणे
 सहकारी सूतगिरणी यांची प्रकल्प अहवाल किंमत ₹80.90 कोटी वरून ₹118 कोटी इतकी सुधारित करण्याबाबतची कार्यवाही करणे
 सातारा जिल्ह्यातील वाई येथील रेड क्रॉस सोसायटी यांच्याकडील भाडेपट्ट्यावरील जागा जिल्हा रेशीम कार्यालयाकरिता कायमस्वरूपी घेणे 

यावेळी मंत्री संजय सावकारे, आमदार अमरीशभाई पटेल व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या