अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि लोककल्याणासाठी लष्करी-नागरी संवाद

अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि लोककल्याणासाठी लष्करी-नागरी संवाद
  • Positive News
  • जून 24 2025

Share on  

अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि लोककल्याणासाठी लष्करी-नागरी संवाद

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज लष्कराच्या दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या उच्चस्तरीय भेटीत उभयतांनी लष्करी-नागरी समन्वय व संवादाच्या अनुषंगाने चर्चा केली.

या बैठकीत नागरी-लष्करी सहकार्य, अंतर्गत सुरक्षा, माजी सैनिकांचे कल्याण तसेच आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विविध महत्त्वपूर्ण व व्यापक विषयांवर सखोल चर्चा झाली. राज्याच्या सुरक्षेची क्षमता बळकट करणे, लोककल्याणाच्या उपक्रमांना गती देणे आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रभावी प्रतिसाद देणे या बाबींवर दोन्ही बाजूंनी एकत्रित प्रयत्नांची तयारी दर्शवली.

ही बैठक भारतीय लष्कराच्या नागरिकांप्रति असलेल्या अविरत सेवाभावाची साक्ष आहे. सर्व स्तरांवर सशक्त लष्करी-नागरी समन्वय साधत, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी लष्कर व नागरी प्रशासन यांच्यातील सहकार्य अधिक सुसंगत व प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे.

याप्रसंगी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या