वर्ष संपतं…
कॅलेंडरची पानं बदलतात.
पण मनातली पानं
इतक्या सहज बदलत नाहीत.
बाहेरचं घड्याळ पुढे सरकत असतं,
पण आत कुठेतरी
काही क्षण थांबलेले असतात.
अपूर्ण…
न बोललेले…
न समजलेले…
या काळात
अंतर्मनाची अवस्था
खूप वेगळी असते.
वरवर सगळं ठीक चाललेलं दिसतं —
काम, जबाबदाऱ्या, रोजचं आयुष्य.
पण आत कुठेतरी
एक शांत अस्वस्थता जाणवते.
दुःखही नाही…
आनंदही नाही…
फक्त
मनाला स्वतःशीच बोलायचं असतं,
पण शब्द मिळत नाहीत.
वर्षाच्या शेवटच्या दिवसांत
भावना जरा जास्तच तीव्र होतात.
जुन्या आठवणी अचानक समोर येतात.
कधी
सुगंधासारख्या…तर कधी
जखमेसारख्या…
काही माणसं
नसतानाही उपस्थित वाटतात.
आणि काही
जवळ असूनही
अपुरी वाटतात.
मन विचारत राहतं…
आपण जे गमावलं
तेच आपलं होतं का?
की
जे सोबत आहे तेच आपण शोधत होतो?
या सगळ्या भावनांमध्ये
एक गोष्ट लक्षात येते —
भावना चुकीच्या नसतात.
त्या फक्त दाबल्या गेल्या असतात. आणि या दाबल्या गेलेल्या भावनाच अनेक आजारांचे मूळ कारण असतात.
आणि जेव्हा आपण
सतत पुढेच धावत राहतो,
तेव्हा या भावना
आपल्याला थांबवून
स्वतःकडे पाहायला सांगत असतात
इथेच
emotional balancing ची गरज असते.
भावना बदलण्यासाठी नाही,
तर त्यांना ऐकण्यासाठी.
कारण
ज्या भावना ऐकल्या जातात,
त्या हळूहळू शांत होतात.
अनेकांना वाटतं —
“माझ्यात पोकळी आहे.”
पण एक सत्य सांगते —
पोकळी नेहमी अभावाची नसते.
कधी कधी
ती जागेची असते.
नव्या अर्थासाठी…
नव्या समजुतीसाठी…
नव्या सुरुवातीसाठी…
Healing म्हणजे
सगळं ठीक होणं नाही.... तर
Healing म्हणजे
जे आहे ते मान्य करणं.
थकवा…
गोंधळ…
कृतज्ञता…
असमाधान…
सगळं एकत्र ठेवून मनाला सांगणं —
“ठीक आहे…
मी आनंदने पुढे चालत आहे.”
वर्षसमारोप हा हिशोब नाही.
तो स्वीकार आहे.
आपण जसे आहोत
तसे स्वतःला
मान्य करण्याचा क्षण आहे.
आणि जर आज
मन जड झाले आहे असे वाटत असेल…
तर स्वतःला एकच गोष्ट विचारा ...
मी माझ्या श्वासाकडे
लक्ष देतेय का/देतोय का?
कारण
श्वास हा
मन आणि शरीर यांना जोडणारा
सगळ्यात जवळचा दुवा आहे.
हळू श्वास घेतला
की मनाला संदेश मिळतो....
“तू सुरक्षित आहेस.”
कदाचित ही पोकळीच
पुढच्या वर्षासाठीची जागा आहे.
थोड्या समजुतीसाठी…थोड्या धैर्यासाठी…
आणि
स्वतःकडे परत येण्यासाठी…
आज काही बदलायची गरज नाही.फक्त स्वतःला थोडा वेळ द्या.
शांत श्वास घ्या…
मन ऐका…
आणि स्वतःशी नम्र रहा.
दिवसातून तीन वेळा डोळे बंद करा , शांत बसून किंवा झोपून मनातल्या मनात 5 मिनिट्स साठी शांतपणे म्हणा.....
I am smiling
I am healing
बघा आत्ता पण तीन वेळा तरी हे करून बघा????????
हीलर अंजली जाधव —
heal.with.anjali
9987553410
(Healing begins with awareness and a gentle smile)