आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश 

आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश 
  • Positive News
  • जुलै 18 2025

Share on  

आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिलेले निर्देश :

 आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी नूतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत. 
 शिर्डी विमानतळावर नवीन एटीसी इमारत, एकात्मिक मालवाहतूक इमारत व टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित असून ही कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. कामांची गती संथ असल्याचे नमूद करून आवश्यक असल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे तसेच विमानतळासाठी आवश्यक असणारी खरेदी व स्ट्रक्चरल डिझाईनची कामे येत्या आठवड्यात पूर्ण करावीत. 
 शिर्डी विमानतळ हे मुंबई व नवी मुंबई विमानतळांच्या जवळचे विमानतळ आहे. येथील लहान विमानांच्या पार्किंगसाठी शिर्डी विमानतळाचा वापर होऊ शकतो. यासाठी शिर्डी विमानतळावर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त जमीन संपादित करण्याची प्रक्रिया हाती घ्यावी. 

या बैठकीत पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, प्रकल्पासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून पुणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, जेणेकरून विमानतळाचे काम लवकर सुरू होईल. हे विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्रातील विमानसेवा अधिक सक्षम होईल.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या