भारताच्या विथ्या रामराजने मोडला पीटी उषाचा ४२ वर्षे जुना विक्रम! रेकॉर्ड मोडल्याचं समजताच नाचू लागली; कांस्य पदकाला गवसणी!

भारताच्या विथ्या रामराजने मोडला पीटी उषाचा ४२ वर्षे जुना विक्रम! रेकॉर्ड मोडल्याचं समजताच नाचू लागली; कांस्य पदकाला गवसणी!
  • Positive News
  • सप्टेंबर 29 2026

Share on  

भारताच्या विथ्या रामराजने मोडला पीटी उषाचा ४२ वर्षे जुना विक्रम! रेकॉर्ड मोडल्याचं समजताच नाचू लागली; कांस्य पदकाला गवसणी!


Asian Games Vithya Ramraj Wins Bronze Medal PT Usha National Record Broken : भारतीय धावपटू विथ्या रामराजने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६मध्ये महिलांच्या ४०० मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत ५४.७५ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावलं. या कामगिरीसह तिने तब्बल ४२ वर्षे जुना पी.टी. उषा यांचा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. या कांस्यपदकासह विथ्या रामराजने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसरं पदक जिंकलं आहे.

पी. टी. उषा यांनी ५५.४२ सेकंदांची वेळ नोंदवत हा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला होता. भारतीय ॲथलेटिक्समधील सर्वाधिक काळ टिकलेल्या विक्रमांपैकी हा एक होता. विथ्या काही काळापासून या विक्रमाच्या जवळ पोहोचत होती. पण आशियाई स्पर्धेत तिने हा विक्रम मोडीत काढला. हा विक्रम मोडल्यानंतरची विथ्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. 
भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासातील एक दीर्घकाळ टिकलेला विक्रम मोडल्याची जाणीव होताच २८ वर्षीय कोयंबतूरच्या विथ्याने मैदानातच नाचून आपला आनंद साजरा केला.

विशेष म्हणजे, मागील आशियाई क्रीडा स्पर्धेतही विथ्या या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचली होती. तिने पात्रता फेरीत ५५.४२ सेकंदांची वेळ नोंदवली होती आणि राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी करण्यापासून ती अवघ्या ०.०१ सेकंदाने दूर राहिली होती. यावेळी मात्र तिने त्या विक्रमाला मागे टाकत कांस्यपदकासह ऐतिहासिक कामगिरी केली.

विथ्या रामराजने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर हर्डल्समध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकलं आहे. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेतही ती तिसऱ्या स्थानावर राहिली होती. या पदकासह या प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं सलग तिसरं पदक ठरलं. २०१८च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत अनु राघवनने कांस्यपदक जिंकलं होतं. यंदा विथ्याने हा सिलसिला कायम ठेवला.

ही अंतिम फेरी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील वेगवान शर्यतींपैकी एक ठरली. यूएईच्या मरियम करीमने ५४.३१ सेकंदांची वेळ नोंदवत विक्रम रचला आणि सुवर्णपदक पटकावलं. कझाकिस्तानच्या अदेलिना झेम्सने ५४.५८ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकलं. भारताची आणखी एक धावपटू अनु राघवन ५५.८८ सेकंदांसह पाचव्या स्थानावर राहिली. तिनेही या शर्यतीत आपली वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली. विशेष म्हणजे अंतिम फेरीतील आठपैकी चार धावपटूंनी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली.

संबंधित बातम्या