भारताच्या खात्यात तिसरं रौप्यपदक! पुरुषांच्या नेमबाजी संघाने मारली बाजी!

भारताच्या खात्यात तिसरं रौप्यपदक! पुरुषांच्या नेमबाजी संघाने मारली बाजी!
  • Positive News
  • सप्टेंबर 22 2026

Share on  

भारताच्या खात्यात तिसरं रौप्यपदक! पुरुषांच्या नेमबाजी संघाने मारली बाजी!


Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या आजच्या दिवसाचे सर्व लाईव्ह अपडेट्स इथे वाचायला मिळणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं पहिलं सुवर्णपदक जिंकण्याचं लक्ष्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही कायम आहे. 

रविवारी भारताच्या महिला नेमबाजांनी दोन रौप्यपदकं जिंकली होती. या दोन पदकांसह भारत दिवसअखेर पदकतालिकेत १०व्या स्थानावर होता. गुणतालिकेत चीन आणि यजमान जपानकडे प्रत्येकी २० पदकं होती. मात्र, चीनने ११ सुवर्णपदकं जिंकल्याने तो जपानच्या पुढे होता.

आज म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी भारताचे टेबस टेनिसमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने मुख्य आकर्षण आहेत. याशिवाय आजपासून कबड्डीचे सामने रंगणार आहेत. तर नेमबाजी, जलतरण, बॅडमिंटन, हॉकी सामनेही असणार आहेत.

सोमवार, २१ सप्टेंबर : भारताच्या महत्त्वाच्या लढती आणि अपडेट्स

शूटिंग | सकाळी ६:१५ आणि ९:००: पार्थ राकेश माने, हिमांशू धिल्लों आणि रुद्रांक्ष पाटील १० मीटर एअर रायफल पुरुष रौप्य पदक आणि त्यानंतर वैयक्तिक अंतिम फेरीत सहभागी.

शूटिंग | सकाळी ६:३०: अनंतजीत सिंग नरुका, भवतेग सिंग गिल आणि मिराज अहमद खान स्कीट पुरुषांच्या पात्रता फेरीत.

शूटिंग | सकाळी ६:३०: परिनाझ धालीवाल, रायझा धिल्लों आणि महेश्वरी चौहान स्कीट महिलांच्या पात्रता फेरीत.

टेबल टेनिस: भारताने महिला सांघिक गट सामन्यात पाकिस्तानचा ३-० असा पराभव केला.

जलतरण: श्रीहरी नटराजने पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरी दुपारी १:३० वाजता.

जलतरण | सकाळी ७:४४: साजन प्रकाश, अनीश सुनील कुमार गौडा, वेदांत माधवन आणि दक्षन शशिकुमार पुरुषांच्या ४x२०० मीटर फ्रीस्टाइल रिलेच्या दुसऱ्या हीटमध्ये.

MMA | सकाळी ८:३०: सुचिका तारियालचा महिलांच्या ट्रेडिशनल -६० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत सिंगापूरच्या टिओ हुई हूनशी सामना.

हॉकी | सकाळी ९:३०: भारतीय महिला हॉकी संघाची इंडोनेशियाविरुद्ध पूल फेरीतील चौथी लढत.

कबड्डी | सकाळी ९:४५: पुरुष कबड्डी संघाचा गट A मधील दुसरा सामना जपानविरुद्ध.

बॅडमिंटन | सकाळी ११:३०: भारतीय पुरुष संघाची पहिल्या फेरीत बांगलादेशविरुद्ध लढत.

टेबल टेनिस | दुपारी ३:३०: जी. साथियान, हरमीत देसाई, मानव ठक्कर, मनुष शाह आणि पायस जैन यांचा पाकिस्तानविरुद्ध पुरुष सांघिक गट F मधील पाचवा सामना.

कबड्डी | दुपारी ४:१५: भारतीय महिला कबड्डी संघाचा गट A मधील दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध.

संबंधित बातम्या