*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३३२ वा दिवस*
नराचा नारायण होणे म्हणजे मानव तत्त्वाची परिपूर्ण अवस्था होय. मनुष्याच्या ठिकाणी जन्मताच वास करून असलेले पूर्णत्व आकारास आणणाऱ्या शिक्षण पद्धतीच्या योगे त्याच्या सामाजिक अस्तित्वातून प्रकट होणारे सद्गुण, सदाचार, सद् विचार हर्ष व आनंद प्राप्त करून घेणे, सुनियोजित व कार्यक्षम अशा शिक्षण पद्धतीतून नवसमाजाची निर्मिती होणे. त्यांच्यात धर्म, करुणा, वास्यल्य, आत्मसाक्षात्कार, दैवी आनंदाच्या प्राप्तीची उच्चतम अवस्था गाठणे. आपल्या देशातील दीनदुबळ्या गरीब लोकांविषयी करुणा त्यांच्या उपाशी तोंडात भाकरीचा घास भरवण्याची वृत्ती सर्वसामान्य लोकांना ज्ञान देण्याची तळमळ समस्त मानव जातीवर प्रेम आपल्या देशावर अत्यंतिक प्रेम ही मानवाची परिपूर्ण अवस्था म्हणावी लागेल.
*स्वामी विवेकानंद...*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर आषाढ २३ शके १९४८*
★ आषाढ शुध्द /शुक्ल १
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. १५ जुलै २०२६
★ १९०३ स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, खासदार के. कामकाज यांचा जन्मदिन.
★ १९२७ सुप्रसिध्द व्याख्याते, लेखक, तत्वज्ञ, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव अनंतराव भोसले यांचा जन्मदिन.
★ १९३२ लेखक, विद्वान, टिकाकार नरहर कुरुंदकर यांचा जन्मदिन.
★ १९६७ सुप्रसिध्द अभिनेते, गायक नारायण श्रीपाद राजहंस तथा "बालगंधर्व" यांचा स्मृतीदिन.
*संकलन - प्रा अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*