*--II ● विवेक विचार ● II--*

      *--II ● विवेक विचार ● II--*
  • Positive News
  • जुलै 16 2026

Share on  

.               *--II ● विवेक विचार ● II--*


*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३३३ वा दिवस* 

        भूतकाळातील ज्ञानाच्या शाश्वत झऱ्यांचे जल आकंठ प्राशन करा, समोर पहा, प्रगतीपथावर पुढे पुढे चला व भारताला पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी, अधिक थोर व अधिक उन्नत बनवा. आपले पूर्वज थोर होते याचे प्रथम आपण स्मरण ठेवले पाहिजे. आपण आपल्या जीवनाचे आधारभूत घटक समजून घेतले पाहिजे, आपल्या शिरांमधून कोणते रक्त वाहत आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. आपण पूर्वीपेक्षाही अधिक थोर, महान अशा भारताची उभारणी केली पाहिजे. एखादा प्रचंड वृक्ष सुंदर व परिपक्व फल निर्माण करतो. ते फल जमिनीवर पडते, कुजते व त्यातून भावी वृक्षाचा अंकुर वर येतो. तो वृक्ष पहिल्यापेक्षाही कदाचित अधिक प्रचंड होतो. ह्या ज्या पतनाच्या कालखंडातून आपल्याला जावे लागले तो आवश्यकच होता. ह्या पतनातूनच भावी काळातील भारत जन्माला येत आहे, तो अंकुरित होत असून त्याची पहिली कोवळी पाने केव्हाच बाहेर पडलेली आहेत आणि एक बलवान, विशाल, महाकाय व ऊर्ध्वमूल असा अश्वत्थ वृक्ष येथे दिसू लागलेला आहे.
                                *स्वामी विवेकानंद...*                        
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर आषाढ २४ शके १९४८*
★ आषाढ शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. १६ जुलै २०२६                                    
★ श्री जगन्नाथ रथयात्रा पुरी                                                      
★ १९०९ थोर स्वातंत्र्यसेनानी, १९४२ च्या चले जाव चळवळीत त्यांनी मुंबई येथे तिरंगा फडकवला होता अशा भारतरत्न अरुणा असीफ अली यांचा जन्मदिन.
★ १९८६ इतिहासकार वासुदेव सिताराम बेंद्रे यांचा स्मृतीदिन.
★ २०२० महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांचा स्मृतीदिन.
*संकलन - प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*

संबंधित बातम्या