*--II ● विवेक विचार ● II--*

   *--II ● विवेक विचार ● II--*
  • Positive News
  • जून 8 2026

Share on  

.               *--II ● विवेक विचार ● II--*


*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२९५ वा दिवस* 

             विधी, अनुष्ठाने वा कर्मकांड हे अगदी खालच्या पातळीवरील साधन होय; त्यानंतर म्हणजे, ईश्वर स्वतःच्या बाहेर आहे असे मानून त्याची उपासना करणे; आणि अखेर म्हणजे, स्वतःच्या आत्म्यामधे ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे. काही विशिष्ट व्यक्तींच्या बाबतीत, एकानंतर एक अशा चढत्या क्रमाने ह्या साधनांची आवश्यकता असणे शक्य आहे, परंतु अधिकांश लोकांच्या बाबतीत केवळ एकाच मार्गाची आवश्यकता असते. 'ज्ञानाचा लाभ करून घ्यावयाचा असेल तर तुम्हाला आधी कर्माच्या आणि भक्तीच्या मार्गांनी गेलेच पाहिजे' असे अगदी प्रत्येकाला म्हणणे म्हणजे मूर्खपणाची कमाल होय. स्वतःच्या मनाची सर्व शक्तींची एकाग्रता हेच आपल्याला ईश्वर दर्शणार्थ सहाय्य करणारे एकमेव साधन आहे जर तुम्ही स्वतःच्या आत्म्याला जाणू शकाल तर तुम्ही भूत वर्तमान आणि भावी सर्वच आत्म्यांना जाणू शकाल इच्छा शक्ती द्वारा मनाची एकाग्रता साधत असते आचार विचार भक्ती प्रणायाम प्रभूतींनी ही इच्छाशक्ती उद्.बुद्ध नि वशीकृत होऊ शकते.
                                 *स्वामी विवेकानंद...*                        
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास १८ शके १९४८*
★ जेष्ठ अधिक वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. ८ जून २०२६ 
★ १९१५ लोकमान्य टिळकांनी ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुंगात "गीतारहस्य" हा महान ग्रंथ लिहून पूर्ण केला, तसेच त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
★ जागतिक महासागर दिन.
*संकलन - प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*

संबंधित बातम्या