*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२९३ वा दिवस*
गेल्या काही हजार वर्षांत भारतात जन्मलेल्या राजांमध्ये शिवाजी महाराज सर्वाधिक महान होते. मुघलांच्या भीषण अत्याचारांपासून आणि विनाशापासून त्यांनी हिंदू समाज व संस्कृतीचे रक्षण केले. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या खूप आधीच त्यांच्याबद्दल भविष्यवाणी करण्यात आली होती; की ते महान कार्यासाठी जन्माला आले आहेत. म्लेच्छांच्या तावडीतून हिंदूंना मुक्त करणारे, तसेच मोगलांच्या विनाशकारी टोळ्यांच्या अत्याचारांनी पायदळी तुडवलेल्या धर्माची पुनर्स्थापना करणारे म्हणून महाराष्ट्रातील सर्व थोर व्यक्ती आणि संत त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. शिवाजी महाराज हे महान राष्ट्ररक्षकांपैकी एक होते, ज्यांनी आपला समाज आणि आपला धर्म संपूर्ण विनाशाच्या धोक्यात असताना त्यांना मुक्त केले. ते एक अतुलनीय वीर, एक धार्मिक आणि ईश्वरभक्त राजे होते आणि खरोखरच आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या जन्मजात मानवनेत्याच्या सर्व सद्गुणांचे मूर्तिमंत रूप होते. त्यांनी आपल्या भूमीच्या अमर आत्म्याचेही प्रतीक केले आणि ते आपल्या भविष्यासाठी आशेचा किरण म्हणून उभे राहिले.
*स्वामी विवेकानंद...*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास १६ शके १९४८*
★ जेष्ठ अधिक वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. ६ जून २०२६
★ १६७४ स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
★ २००२ सुप्रसिध्द मराठी कवयित्री, गीतकार शांताबाई शेळके यांचा स्मृतीदिन.
★शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला I
अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला II
३५२ व्या शिवराज्याभिषेक (हिंदू साम्राज्यदिन) सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
*संकलन - प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*