--II ● विवेक विचार ● II--

  --II ● विवेक विचार ● II--
  • Positive News
  • ऑक्टोबर 21 2025

Share on  

.               --II ● विवेक विचार ● II--
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०६५ वा दिवस 

            ॐ असतो मा सद्गमय 
             तमसो मा जोतिर्गमय 
             मृत्योर्मा अमृतं गमय ।
साऱ्या जगाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता आहे. हा ज्ञानरुपी प्रकाश मिळवण्यासाठी जग मोठ्या उत्सुकतेने आपल्याकडे पाहत आहे. आणि केवळ भारतीयांजवळ हा ज्ञानरुपी तेजोमय प्रकाश आहे. आपण तो मुक्तपणे जगाला वाटून दिला पाहिजे. सार्‍या जगात या प्रकाशाचा झगमगाटात व्हायला हवा. त्याग आणि सेवा हेच भारताचे राष्ट्रीय आदर्श आहेत. आणि सेवाभावचा प्रचार केवळ भारतातच झाला आहे, केवळ येथेच अति प्राचीन काळापासून अगदी वर्तमान काळापर्यंत प्रत्येक माणसांसमोर सर्वोच्च आदर्श ठेवले गेले आहेत. मानव जातीविषयी हा सद्गुण या मातृभूमीतूनच प्रकट झाला आहे.
                                 स्वामी विवेकानंद...                                  
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २९ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन अमावस्या 
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २१ ऑक्टोबर २०२५
★ लक्ष्मी पूजन, कुबेर पूजन
★ वही, रोजमेळा पूजन 
★ अलक्ष्मी निस्सारण
★ अभ्यंगस्नान, यमतर्पण
★ १८३३ स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्काराचे प्रणेते अल्फेड नोबेल यांचा जन्मदिन.
 ★ १९२० वैदिक धर्म, संस्कृती, तत्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन विविध विषयांवर १९७ ग्रंथांचे लेखन करणारे धर्मभास्कर ग. ना. कोपरकर यांचा जन्मदिन.
★ १९४३ आझाद हिन्द सेनेची सिंगापूर येथे स्थापना 
★ १९५१ डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.
★ भारतीय पोलिस स्मृती दिन.
★ दिपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा...
संकलन - प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
 

संबंधित बातम्या