--II ● विवेक विचार ● II--

  --II ● विवेक विचार ● II--
  • Positive News
  • एप्रिल 4 2025

Share on  

  --II ● विवेक विचार ● II--
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८६६ वा दिवस

         प्रत्येक गोष्टीतील आवश्यक भाग कोणता व अनावश्यक भाग कोणता याचा विवेक करायला शिकले पाहिजे. गाभा हा शाश्वत असतो. अन्य गोष्टी या काही मर्यादित काळापुरत्या महत्त्वाच्या असतात.  वेदांमध्ये सांगितलेली सत्य तत्वे शाश्वत, चिरकाल आहेत. ती त्रिकालाबाधित आहेत पण स्मृती मात्र कालसापेक्ष आहेत. जसजसा कालौघ पुढे जाईल तसतशा नवनव्या स्मृती येत राहतील. या देशाच्या भूतकाळात अनेक श्रेष्ठत्तम गोष्टी घडल्या आहेत. भविष्यकाळात याहुनी श्रेष्ठतम गोष्टी घडावयास मोठा वाव आहे. आपण सर्वांनी मिळून पुढे गेले पाहिजे. प्रगती केली पाहिजे, पराक्रम केला पाहिजे. श्रेष्ठतम कृती हेच आपले अंतिम ध्येय असले पाहिजे.
                          स्वामी विवेकानंद...                                     
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १४ चैत्र शके १९४७
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७ 
★ शुक्रवार दि. ४ एप्रिल २०२५
★ १८२३ सुप्रसिध्द जर्मन विद्युत अभियंता सर कार्ल विल्यम सिमेन्स (अभियांत्रिकी क्षेत्रातील नावाजलेली बलाढ्य "सिमेन्स" ही कंपनी त्यांच्याच नावाने स्थापन झाली आहे) त्यांचा स्मृतीदिन
★ १९६८ नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे नेते मार्टीन ल्यूथर किंग ज्युनियर यांची हत्या. स्मृतिदिन.
संकलन - प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

संबंधित बातम्या