--II ● विवेक विचार ● II--

 --II ● विवेक विचार ● II--
  • Positive News
  • जून 4 2026

Share on  

 --II ● विवेक विचार ● II--
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२९० वा दिवस 

            भारत मातेच्या शूर, वीर, सामर्थ्यवान योद्ध्यांनो ! आपल्या योजनांवर काम करण्यासाठी स्वतःची सर्व शक्ती वेचा. झोकून देऊन काम करा. तुम्ही सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सामर्थ्यशाली आहात, असा आत्मविश्वास सदैव अंगी बाळगा. आपल्यात दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत करा. आपल्यातील आशावाद व सकारात्मकता सतत वाढीस लागली पाहिजे. आपल्यातल्या सुप्तशक्तीला आवाहन करा. मग पहा ती कशी जागृत होऊन कार्यप्रवण होते. ही सुप्त आत्मशक्‍ती जागृत कार्यशक्तीच्या रूपात प्रकट झाली म्हणजे तुमच्यात सामर्थ्य येईल, वैभव येईल, सद्गुण येतील, सुचिता येईल, त्यागी वृत्ती येईल. जे उदात्त, उत्तम, उन्नत आहे ते सारे काही येईल.
                                 स्वामी विवेकानंद...                        
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास १३ शके १९४८
★ जेष्ठ अधिक वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. ३ जून २०२६
★ संकष्ट चतुर्थी 
★ १८१८ मराठेशाहीचा अस्त. शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले. शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला.
★ १९१६ महर्षी धोंडो केशव कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
★ १९४७ हिंदुस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
★ १९८४ पंजाबमधिल अमृतसर येथील सुवर्णमंदिरातून खलिस्थानवादी दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेने "ऑपरेशन ब्लू स्टार" लष्करी कारवाई केली.
★ २०१४ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन
★ जागतिक सायकल दिन.
संकलन - प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

संबंधित बातम्या