योग्य आहार नियोजनातून स्वास्थ सुदृढ : आहारतज्ज्ञ क्षितिजा गायकवाड

योग्य आहार नियोजनातून स्वास्थ सुदृढ : आहारतज्ज्ञ क्षितिजा गायकवाड
  • Positive News
  • जून 17 2025

Share on  

योग्य आहार नियोजनातून स्वास्थ सुदृढ : आहारतज्ज्ञ क्षितिजा गायकवाड 

नाशिक : विद्यार्थी  आणि तरुण अवस्थेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आहाराचे योग्य  नियोजन करणे गरजेचे आहे कारण स्वतःच्या आहाराचे योग्य नियोजन केल्यास मानसिक व शारीरिक स्वास्थ्य  सुदृढ ठेवता येते असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ  क्षितिजा गायकवाड यांनी केले.
डॉ. नाईकवाडी  नर्सिंग कॉलेजच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या न्यूट्रिशन एक्झिबिशन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
यावेळी व्यासपिठावर संस्थेचे चेअरमन डॉ. रामदास नाईकवाडी, मुख्य कार्यकारी अधिकारी मलसराज पाटील, डॉ.संतोष डेंगळे, डॉ. तेजस सूर्यवंशी, डॉ, निदा खान, अपर्णा जाधव, डॉ. विपुल अडबले, सोमनाथ बिरादर, शिवानंद बेलागी आदी उपस्थित होते.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध आजारानुसार  रुग्णांच्या आहाराचे  मेनू प्लॅनिंग करून प्रत्यक्षात ते बनवून प्रेझेंटटेबल फॉर्ममध्ये सादर केले होते .आहार तज्ञ क्षितिजा गायकवाड यांनी त्याचे  विश्लेषण करून कुठल्या आजारामध्ये कोणते पदार्थ जास्त घ्यावे, कुठले कमी घ्यावे किंवा अजिबात घेऊ नये म्हणजे रुग्णांचा आजार अधिक वाढणार  नाही  किंवा लवकर बरे होण्यास कशी मदत होईल याचे मार्गदर्शन केले.
 

संबंधित बातम्या