नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली जन शिक्षण संस्थान नाशिक व गुंज फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डी जी पी नगर-1 येथे शिलाई मशीन वाटप प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला डीजीपी नगर येथील 20 घरेलू काम करणाऱ्या महिला व युवतींसाठी असिस्टंट ड्रेस मेकर चे प्रशिक्षण यशस्वीरित्या देण्यात आले त्यातील नऊ महिलांना गुंज फाउंडेशन तर्फे शिलाई मशीन देण्यात आल्या व उर्वरित 20 महिलांना असिस्टंट ड्रेस मेकर कोर्सचे स्किल इंडियाचे प्रमाणपत्र देण्यात आले
सदर कार्यक्रमास जन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. नानासाहेब दादा ठाकरे, जन शिक्षण संस्थेचे संचालक श्री. राहुल ठाकरे ,गुंज फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय गोयल सर ,गुंज फाउंडेशनचे संस्थापक संजय अग्रवाल, अंजली अग्रवाल ,गुंज फाउंडेशन सदस्य करुणा गोयल, दिपाली गुप्ता ,बोरा मॅडम, रूपाली कपूर, किशोर भंडारी, राखी भंडारी, अजित गुप्ता ,विकी कपूर, प्राजक्ता वाणी, तसेच एक्सेल एज्युकेशन संस्थेचे विभागीय संचालक जयंती विश्वनाथन, प्राचार्य स्वाती गायकवाड व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते
सदर कार्यक्रमास जन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री नानासाहेब ठाकरे अध्यक्षस्थानी होते आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांना मार्गदर्शन करत असताना ज्या महिलांना शिलाई मशीन मिळालेल्या आहेत अशा महिलांना आयुष्यभर स्वालंबी बनवण्यासाठी आजची ही शिलाईमशीन ची मदत गुंज फाउंडेशन ने केलेली फार मोठी मदत असून महिलांनी नवनवीन ड्रेसेस शिवण्याचे व्यवसाय सुरू करावा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करून त्यातून जो रोजगार मिळेल त्यामुळे आपल्या कुटुंबाला निश्चितच आर्थिक हातभार लागेल महिलांनी आत्मनिर्भर बनावे
तसेच गुंज फाउंडेशन करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक ही केले.
जन शिक्षण संस्थेचे संचालक राहुल ठाकरे सर यांनी प्रास्ताविक पर भाषणात जन शिक्षण संस्थेचे कोर्सेस व उपक्रम ची माहिती दिली
संस्थेने गेल्या 30 वर्षात वर्षात अनेक महिला व पुरुषांना विविध प्रकारांच्या व्यावसायिक कोर्सेसच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे
तसेच गुंज फाउंडेशन बरोबर काम करत असताना महिलांना असिस्टंट ड्रेस मेकर चे प्रशिक्षण संस्थेने दिले असता प्रशिक्षणार्थींना नाशिक सिव्हिल हॉस्पिटल मधील गरोदर महिलांच्या बाळांच्या बेबी सूट ची ऑर्डर दिली, त्यामुळे महिलांना रोजगार मिळून कुटुंबाला आर्थिक हातभार पण लागला तसेच कापडी बॅग साठी लागणारा कपडा पण गुंज फाउंडेशन ने दिल या पुढे ही समाज उपयोगी उपक्रम प्रशिक्षणाच्या माध्यमातून गुंज फाउंडेशन बरोबर राबू असे त्यांनी सांगितले.
गुंज फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गोयल सर यांनी आपल्या भाषणात गुंज फाउंडेशन करत असलेल्या कार्याची माहिती दिली व मी जन शिक्षण संस्थेच्या संपर्कात आलो व आपण महिलांना स्किलिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक मदत पण करू ,तसेच गुंज फाउंडेशन राबवित असलेले विविध उपक्रम शिलाई मशीन वाटप, टेलरिंगचे प्रशिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना सायकल देणे, कॉम्प्युटरचे प्रशिक्षण अशा विविध प्रकारच्या उपक्रमातून समाजातील गरजू महिला व विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करत आहोत असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जन शिक्षण संस्थेचे कार्यक्रमाधिकारी संदीप शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुंज फाउंडेशन सदस्य विकी कपूर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जन शिक्षण संस्थेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी दत्तात्रय भोकनळ, मनोज खांदवे व मार्गशिक्षिका प्रिया खैरनार व उपस्थित प्रशिक्षणार्थींनी परिश्रम घेतले .