जीएसटी सुधारणा : आर्थिक सबलीकरणाचा नवा अध्याय!

जीएसटी सुधारणा : आर्थिक सबलीकरणाचा नवा अध्याय!
  • Positive News
  • सप्टेंबर 5 2025

Share on  

जीएसटी सुधारणा : आर्थिक सबलीकरणाचा नवा अध्याय!

मुंबई : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेल्या 'नवोन्मेषी जीएसटी सुधारणा' आता प्रत्यक्षात अमलात आल्या असून, जीएसटी परिषदेने केंद्र सरकारच्या प्रस्तावांना एकमताने मंजुरी दिली आहे.

आता 12% व 28% ऐवजी फक्त 5% आणि 18% कर लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांवरील कर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून हा बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल.

या सुधारणांमुळे शेतकरी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, महिला, युवक, छोटे व्यापारी तसेच मध्यमवर्ग यांना दिलासा मिळणार आहे. आरोग्यविषयक सेवा अधिक परवडणाऱ्या होतील आणि देशभरातील उद्योगसुलभतेस नवे बळ मिळेल.

हा निर्णय नागरिकांच्या सबलीकरणासाठी व देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व मा. केंद्रीय मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक आभार!
 

संबंधित बातम्या