सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा

सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा
  • Positive News
  • ऑक्टोबर 30 2025

Share on  

सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा


नाशिक दि. २९ (प्रतिनिधी) :- सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार दि.०६ नोव्हेंबर  २०२५ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली आहे.
 
राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय शिक्षण मंत्री ना.दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
 
यापुर्वी राज्याचे उप मुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, भारत सरकारचे माजी मंत्री खा.प्रफुल पटेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री ना.छगनराव भुजबळ, माजी मंत्री आ.जयंत पाटील, माजी मंत्री विनायकदादा पाटील  यांच्या शुभहस्ते “सुविचार गौरव” पुरस्कार वितरण सोहळे नाशिक येथे संपन्न झाले आहेत.
 
हिंदी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायक पद्मश्री सुरेश वाडकर, संगीत दिग्दर्शक अनु मलिक, अभिनेते स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, अभिजित खांडकेकर, अभिनेत्री पूजा सावंत, असायचा देवधर, अभिनेते गौरव चोपडा, हार्दिक जोशी, अभिनेते चिन्मय उदगीरकर, शिक्षणतज्ञ डॉ.प्रा.एम.एस.गोसावी, जेष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे,सुवर्णपदक विजेता आंतरराष्ट्रीय रोइंगपटटू दत्तू भोकनळ, रामबंधू मसालाचे संचालक हेमंत राठी, जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.दिलीप धोंडगे, हृदयरोग तज्ञ डॉ.राहुल कैचे, डॉ.अतुल वडगांवकर, महिला क्रिकेटपटू ईश्वरी सावकार, माया सोनवणे, जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.दिलीप धोंडगे, प्रा.शं.क.कापडणीस,मोहनलाल कुमट यांच्यासह जीवन गौरव, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग व सहकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सुविचार गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
 
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून सुविचार गौरव पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीच्या सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे लवकरच  जाहीर करण्यात येणार आहेत.
 
या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी संयोजक आकाश पगार मोबा. ९४२१५६३५५५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या