१ कप गव्हाचे पीठ
१/४ कप कोको पावडर
१ टीस्पून बेकिंग पावडर
१/२ टीस्पून बेकिंग सोडा
चिमूटभर मीठ
१/४ कप तूप
१/२ कप गूळ (किसलेला)
१/२ कप दूध
१/४ कप दही
१ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
१/२ कप सुका मेवा (बारीक चिरलेला)
१/४ कप डार्क चॉकलेटचे तुकडे
१. हृदयाच्या आकाराचा साचा तुपाने ग्रीस करून बटर पेपर लावा.
२. ओव्हन १६०–१६५°C ला गरम करा.
३. गव्हाचे पीठ, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व मीठ चाळून घ्या.
४. कोमट तूप व गूळ नीट फेटून घ्या.
५. त्यात दही, दूध व व्हॅनिला इसेन्स घालून गूळ विरघळेपर्यंत ढवळा.
६. आता हळूहळू कोरडे साहित्य घालून एकत्र करा.
७. जर मिश्रण घट्ट वाटले तर १–२ टेबलस्पून दूध घाला.
८. चिरलेला सुका मेवा थोड्या पीठात घोळवून घ्या आणि मिश्रणात मिसळा.
९. त्यात चॉकलेटचे तुकडे घालून सजवा.
१०. ३५–४० मिनिटे बेक करा. टूथपिक स्वच्छ बाहेर आली की केक तयार!
हा लेख फक्त माहिती आणि गृहिणी/होम शेफ्स यांच्या अनुभवांवर आधारित आहे. दिलेल्या रेसिपी घरी करून पाहताना प्रमाण, चव आणि आरोग्यदृष्ट्या आवश्यक ते बदल प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीवर करावेत.
या गणेशोत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी या अनोख्या रेसिपी नक्की करून बघा आणि आनंद द्विगुणित करा!