राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी त्या अनुषंगाने जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
जागा- पुणे पदवीधर- भाजप- डॉ. स्मिता जाधव (अधिकृत उमेदवार), राष्ट्रवादी-सुनील टिंगरे (इच्छुक), राष्ट्रवादी श.प. भैया माने (इच्छुक).
जागा-पुणे शिक्षक- भाजप- कौस्तुभ गावडे (अधिकृत उमेदवार), शिवसेना- मंगेश चिवटे (इच्छुक), काँग्रेस- जयंत आसगावकर (अधिकृत उमेदवार).
जागा- नागपूर पदवीधर- भाजप- सुधाकर कोहळे (अधिकृत उमेदवार), भाजप-अनिल सोले (इच्छुक), काँग्रेस-अभिजीत वंजारी (अधिकृत उमेदवार).
जागा- अमरावती शिक्षक- काँग्रेस-अदिती पोहरे (अधिकृत उमेदवार), शिवसेना ठाकरे गट- दत्तात्रय लहाने (अधिकृत उमेदवार), शिवसेना- किरण सरनाईक (इच्छुक) शिवसेना- श्रीकांत देशपांडे (इच्छुक), भाजपृ संगीता शिंदे (इच्छुक), भाजप- शेखर भोयक (इच्छुक).
जागा-छत्रपती संभाजीनगर पदवीधर-मराठवाडा शिक्षक संघ- सुशील घोटे-पाटील (अधिकृत उमेदवार), राष्ट्रवादी- सतिश चव्हाण (अधिकृत उमेदवार), राष्ट्रवादी श.प.-प्रतापसिंह पाटील (इच्छुक), शिवसेना ठाकरे गट-दिलीप घुगे (इच्छुक).