नाशिकमध्ये पहिल्यांदाच जागतिक किर्तीचा ‘सूर्यकिरण’ एअर शो!

नाशिकमध्ये पहिल्यांदाच जागतिक किर्तीचा ‘सूर्यकिरण’ एअर शो!
  • Positive News
  • जानेवारी 7 2026

Share on  

नाशिकमध्ये पहिल्यांदाच जागतिक किर्तीचा ‘सूर्यकिरण’ एअर शो!

नाशिक :  नाशिक शहरासाठी अभिमानास्पद अशी ऐतिहासिक घटना लवकरच घडणार आहे. भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) जागतिक कीर्तीच्या ‘सूर्यकिरण एरोबॅटिक टीम’चा एअर शो नाशिकमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत आहे.
हा नेत्रदीपक एअर शो पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे.

अंतिम एअर शो : 23 जानेवारी 2026
सराव सत्र : 22 जानेवारी 2026
स्थळ : गंगापूर धरण परिसर, नाशिक
वेळ : सकाळी 10.00 ते दुपारी 12.00

या एअर शोमध्ये सूर्यकिरण टीमकडून आकाशात थरारक आणि शिस्तबद्ध हवाई कसरती सादर केल्या जाणार आहेत. देशभक्ती, शौर्य आणि भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वरील बातमी ही उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या वेळेत, स्थळात किंवा आयोजनासंदर्भातील तपशीलांमध्ये प्रशासन किंवा आयोजकांकडून बदल होऊ शकतात. अचूक व अधिकृत माहितीसाठी संबंधित प्रशासन, आयोजक किंवा अधिकृत प्रसिद्धीपत्रकांचा संदर्भ घ्यावा.

संबंधित बातम्या