विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोली आणि कावनई  येथे स्वच्छतागृहांचे लोकार्पण राऊंड टेबल इंडिया आणि लेडीज सर्कल इंडियाचा उपक्रम 

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोली आणि कावनई  येथे स्वच्छतागृहांचे लोकार्पण राऊंड टेबल इंडिया आणि लेडीज सर्कल इंडियाचा उपक्रम 
  • Positive News
  • जून 30 2026

Share on  

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोली आणि कावनई  येथे स्वच्छतागृहांचे लोकार्पण राऊंड टेबल इंडिया आणि लेडीज सर्कल इंडियाचा उपक्रम 

नाशिक : शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने राऊंड टेबल इंडिया, लेडीज सर्कल इंडिया आणि ड्रीम इंजिन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या अंतर्गत प्रयास स्कूल फॉर स्पेशल नीड्स किड्स गायकवाड नगर मुंबई नाका येथे एका सुसज्ज वर्गखोलीचे तसेच कवनई स्कूल येथे दोन स्वच्छतागृह ब्लॉकचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले.

'Freedom Through Education' या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून कवनई शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहांची सुविधा निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच आरोग्य व स्वच्छतेलाही चालना मिळणार असल्याचे यावेळी अमित बर्डीया यांनी सांगितले.

या लोकार्पण सोहळ्यास एरिया-३ चेअरमन टीआर. अमित बर्डिया तसेच एरिया-३ चेअरपर्सन सीआर. मेघा राठी, टीआर. प्रितेश वैश्य (चेअरमन, NSRT 245) आणि सीआर. ऋतू वैश्य (चेअरपर्सन, NSLC 204) यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
समाजातील वंचित आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी ठरत असून शिक्षण आणि समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे असल्याची भावना यावेळी प्रयासच्या पदाधिकारी रोहिणी वाघ यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी प्रयासच्या विशेष शिक्षिका रिया चिंडालिया, सायली मुकाने,शितल सोनार,सायकॉलॉजिस्ट पुनम अवस्थी,शरद गांगुर्डे, रुबी पवार, कीर्ती गायकवाड, आरती सनंसे, शितल कोराटे, शशिकला गांगुर्डे आदिनी संयोजन केले.

संबंधित बातम्या