के के वाघ तर्फे 'आर्थिक साक्षरता व गुंतवणूक' कार्यशाळा

के के वाघ तर्फे 'आर्थिक साक्षरता व गुंतवणूक' कार्यशाळा
  • Positive News
  • ऑगस्ट 31 2025

Share on  

के के वाघ तर्फे 'आर्थिक साक्षरता व गुंतवणूक' कार्यशाळा

नाशिक-  के के वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, कोना कोना शिक्षा अभियान व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरीटी मार्केट(निसीम) यांच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक  या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे राहुल सिंग व विजय सोनावणे हे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर यांनी भुषविले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्या डॉ.  अनुराधा नांदुरकर व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. अर्चना बधान, बी. बी. ए  विभाग  प्रमुख प्रा. पंकज देसाई उपस्थित होते.

 

 

श्री. राहुल सिंग यांनी विद्यार्थ्याना प्राथमिक आणि दुय्यम बाजार,  पैशाचे भविष्यासाठी नियोजन व गुंतवणूक, म्युच्युअल फंडची माहिती आणि महत्व, करिअर संधी  म्युच्युअल फंड वितरक, निधी व्यवस्थापक याबद्दल मार्गदर्शन केले. 

 

कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षा घेऊन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन तेजश्री भोये या विद्यार्थ्यांनी केले.  

 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकवृंद कर्मचारी यांनी प्रयत्न केले. 

संबंधित बातम्या