24 जागतिक विक्रम करणारे तसेच सातत्यपूर्ण 8.5 वर्ष सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा करणारे गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संदीप भानोसे यांचे सामाजिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आज त्यांच्यासारखे सामाजिक कार्य करणारे प्रत्येक गावात ,शहरात असेच कार्य करणे आवश्यक आहे असे गौरव उद्गार सुप्रसिद्ध व्यावसायिक तसेच सॅटर्डे संडे सायकलिस्ट ग्रुपचे आधारस्तंभ किशोर माने सरकार यांनी केले.
गरुड झेप प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम करत नासिक मध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. *गडकोट संवर्धन , गोदावरी स्वच्छता अभियान , बेटी बचाव बेटी पढाव अभियान व वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा* अभियान गेली 8.5 वर्षे सातत्यपूर्ण राबवत नवीन 24 वा जागतिक विक्रम केला आहे.
गेली दोन वर्षे सॅटर्डे संडे सायकलिस्ट क्लब *नासिक - पंढरपूर सायकल वारीचे* आयोजन करत आहे. क्लबचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना तसेच जेष्ठ व्यक्तींना सन्मान व काळजी घेतली जाते.
गेली *3030 दिवस सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान डॉ संदीप भानोसे व गरुड झेप चे कार्यकर्ते* राबवत आहेत. त्यांच्या या कार्याचा विशेष गौरव *सॅटर्डे संडे सायकलिस्ट क्लबने केला*. व्यासपीठावर *तृप्तीदा काटकर, किशोर माने सरकार, राजेंद्र देसले, ज्ञानेश्वर बोरसे, दत्तू मामा टिळे* उपस्थित होते. माने सरकारांनी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन डॉ भानोसे यांचा यथोचित गौरव केला.
सदर कार्यक्रम विराट मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला.
माजी वायु सेनेचे अधिकारी सूर्यकांत आहेर यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. तसेच बुलंद आवाजात ,*"सायकल चालवा पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी बचाव ,हम फिर तो इंडिया फिट* या घोषणांनी कार्यालय दुमदुमून टाकले.
सदर कार्यक्रमाला दीडशे अधिक सायकलिस्ट उपस्थित होते.