भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपाला विशेष धार्मिक आणि औषधी महत्त्व आहे. तुळस ही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते आणि घरात सुख-समृद्धी आणते, अशी श्रद्धा आहे. मात्र बदलते हवामान, जास्त किंवा कमी पाणी आणि योग्य काळजी न घेतल्यामुळे तुळशीचे रोप लवकर कोमेजते किंवा सुकते. अशावेळी काही घरगुती उपाय तुळशीचे रोप निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. त्यापैकीच एक भन्नाट उपाय म्हणजे तुळशीच्या कुंडीत लिंबाची साल वापरणे.
लिंबामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक केवळ शरीरासाठीच नव्हे तर झाडांसाठीही फायदेशीर मानले जातात. विशेषतः लिंबाच्या सालीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.
लिंबाच्या साली कुजल्यावर त्यातील पोषक घटक मातीत मिसळतात आणि तुळशीच्या मुळांना पोषण मिळते. त्यामुळे रोप अधिक हिरवेगार आणि मजबूत वाढण्यास मदत होते.
तुळशीच्या पानांवर अनेकदा मुंग्या, अॅफिड्ससारखे छोटे कीटक आक्रमण करतात. लिंबाच्या सालीचा तीव्र सुगंध नैसर्गिक कीटकनाशकाप्रमाणे काम करतो. त्यामुळे कीटक दूर राहण्यास मदत होते आणि पानांचे नुकसान कमी होते.
याशिवाय, कुंडीतून येणारा ओलसर वास कमी करण्यासाठीही लिंबाची साल उपयुक्त ठरू शकते, विशेषतः झाडाला जास्त पाणी दिल्यास.
तज्ज्ञांच्या मते, लिंबाची साल थेट मातीत टाकू नये. कारण त्यामुळे मातीतील आम्लता वाढू शकते. तुळशीला संतुलित माती आवश्यक असते.
यामुळे मातीचा pH बिघडत नाही आणि रोपाला आवश्यक पोषण मिळते.
तुळशीच्या रोपासाठी लिंबाची साल योग्य प्रमाणात वापरल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. यामुळे माती सुपीक राहते, कीटक दूर राहतात आणि रोप अधिक ताजेतवाने दिसते. मात्र कोणताही उपाय मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे.
ही माहिती सामान्य घरगुती आणि बागकामविषयक माहितीसाठी देण्यात आली आहे. प्रत्येक रोपाची वाढ, माती आणि हवामान वेगवेगळे असू शकते. कोणताही नवीन उपाय वापरण्यापूर्वी बागकाम तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.