नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज,नाशिक संचलित समाजकार्य महाविद्यालय,नाशिक यांच्या वतीने आदिवासी विकास विभाग अंतर्गत आयडियाझम सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरगाणा तालुक्यातील चिंचपाडा या आदिवासी वस्तीवर दिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे रिसर्च स्कॉलर आणि आयडियाझम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नारायण गभाले, आदिवासी विकास या विशेष विषयांचे सर्व विद्यार्थी यांनी सुरगाणा तालुक्यातील चिंचपाडा (त्रिभुवन) यागावी जाऊन संपूर्ण गावाची स्वच्छता केली,गावात फुलांची आरास करून रांगोळी काढली, लायटिंग व आकाश कंदील लावले, फुग्यांनी गाव सजविले. संध्याकाळी विविध कलापथकाच्या माध्यमातून टिपरी नृत्य, डोंगरदेव नृत्य, विविध आदिवासी नृत्य सादर केले.
सर्व महिलांना रात्रीच्या वेळी उपयोग होईल अशा चार्जिंग बॅटरी वाटल्या,दिवाळी फराळासाठी आवश्यक किराणा, पणत्या आणि राजगिरा लाडूचे वाटप केले.
शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले ज्यात दप्तर, अंकलिपी, वह्या, लेखन पॅड, पाणी बॉटल, खाऊ यांचा समावेश होता. रात्री या मुलांसमवेत फटाके फोडून दिवाळीचा आनंद त्यांचे समवेत घेतला आणि एक दिवस आदिवासी समाजाबरोबर राहून दिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला. यात गावकऱ्यांनी उस्फुर्त असा सहभाग या संपूर्ण उपक्रमामध्ये नोंदविला, तसेच समाजकार्य महाविद्यालयाच्या आदिवासी विकास विभागाच्या विद्यार्थ्यांनी "रानझोपडी" या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पर्यटन स्थळाला देखील भेट दिली.यासाठी आयडियाझम संस्थेचे संकेत बिडगर, संतोष बोंबले, अजय हांडे, अनुराधा सिंग,अनुज देवरे, प्रा निकिता कुवर, आदित्य राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी यशवंत बंगाळ, भाऊराव बंगाल, काशीराम चौधरी, पोपटराव भोये यांसह गावकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.या सर्व उपक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास देशमुख,सर्व प्राध्यापक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. नारायण गभाले यांनी केले.