-कर्जमुक्ती -ऋणमुक्ति-
कर्जमुक्ती हा अलीकडे अनेक लोकांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. अनेक लोकांना कर्ज घ्यावे लागते पण ते फेडण आता अवघड होत आहे. हल्लीच्या काळात कर्ज मिळणं सोपं झालेलं आहे आणि ते फेडणे तितकंच अवघड झालेले आहे. यासाठी अर्थातच अनेक जातक एखादा मंत्र किंवा एखादी उपासना याबद्दल विचारणा करतात मात्र कोणत्याही एकाच मंत्राने किंवा उपासनेने कर्ज फिटले जात नाही. तसे असते तर सगळ्यांनीच कर्ज घेऊन तो मंत्र म्हणून कर्ज फेडलं असतं. कर्ज फेडसाठी तुमची कुंडली अतिशय महत्त्वाची आहे. ती तपासून त्यावरूनच कोणता उपाय आणि उपासना केली पाहिजे हे ठरवता येतं.
कर्ज अनेक प्रकारचे असतात. जर बँकेचे कर्ज घेतलेले असेल तर जातकाचे षष्ठ स्थान आणि व्यय स्थान तपासलं पाहिजे. त्या स्थानांचे भावेश कुठे आणि कोणासोबत आहेत तसेच ते कोणाशी कोणते अंशात्मक योग करत आहेत याचा देखील अभ्यास केला पाहिजे. जर खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलेले असेल तर सप्तम स्थान तपासलं पाहिजे आणि त्यानुसार उपाययोजना केली पाहिजे. जर नातेवाईकांकडून कर्ज घेतलेले असेल तर तृतीय स्थान तपासले पाहिजे. अनेकांना असं वाटतं की आपल्याला अचानक कुठून तरी धनप्राप्ती व्हावी आणि आपलं सगळं कर्ज फ़िटून जावे. सहसा असं अचानक धनप्राप्ती होत नाही मात्र काही जातकाच्या बाबतीत अचानक धनप्राप्तीचा योग येतो. असा योग येणार किंवा नाही यासाठी पंचम स्थान तपासलं पाहिजे. (या स्थानावरून लॉटरी, सट्टा, शेअर्स इत्यादी बघतात). तसंच नवम स्थान देखील अभ्यासले पाहिजे. त्यावरून अशा प्रकारे पैसे येतील की नाही ते समजू शकते.
कर्ज कधी फिटेल हे देखील पत्रिकेवरून बघता येतं. त्यासाठी सहावा स्थान, बारावे स्थान, सातवे स्थान तसेच द्वितीय स्थान म्हणजे दुसरं स्थान यांचे भावेश, सोबत या स्थानांमधील ग्रह, महादशा, अंतर्दशा, तसंच अष्टक वर्गात या स्थानांना किंवा या भावांना किती गुण मिळाले आहेत याचा देखील अभ्यास करावा लागतो. आता कोणती महादशा, अंतर्दशा चालू आहे त्यावरून हे सांगता येतं. त्याचप्रमाणे कोणत्या देवतेच्या उपायाने आणि उपासना केल्याने कर्जफेड होईल ते देखील या अभ्यासानंतरच समजू शकते. याचबरोबर दशम स्थान आणि लाभस्थान म्हणजे 11 वे स्थान याचा देखील विचार केला पाहिजे. कारण यातूनच तुम्हाला लाभ होणार असतो. अष्टमस्थानावरून तुम्हाला जोडीदाराच्या घरून काही मदत मिळणार का याची देखील माहिती मिळते. अशा प्रकारे कुंडलीचा सर्वांगाने विचार करून मगच कर्जमुक्ती आणि त्याच्यावरचे तोडगे सांगता येतात. यासाठी शक्यतो सायन कुंडलीचा विचार करावा.
काही लोकांना व्यसने केल्यामुळे कर्ज होत असतील आणि त्यांची व्यसने अजूनही चालू असतील तर कोणतीही उपासना फळास येणार नाही. त्यांना आधी व्यसनांपासून पूर्णतः दूर व्हावेच लागेल याची नोंद घ्यावी.
तुमची क्षमता आहे म्हणूनच तुम्हाला कर्ज मिळालेले आहे. तेव्हा खचून जाऊ नका. मनापासून प्रयत्न करा, कर्ज नक्कीच फिटेल. देवतेची उपासना आणि तोडगे अवश्य करा. (हे तोडगे अत्यंत कमी खर्चाचे असले पाहिजेत, महागड्या पूजा, शांती करण्याची गरज नाही) मात्र कर्जफेडीसाठी संयम आवश्यक आहे. कोणत्यातरी एकाच ज्योतिषावर विश्वास ठेवा. अन्यथा तुम्ही गोंधळून जाल आणि कोणतीही उपासना पूर्ण होणार नाही. तुमचा आत्मविश्वास वाढवा आणि सातत्याने प्रयत्न सुरू करा. एक दिवस तुम्ही कर्जमुक्त असाल. श्री. गुरुदेव दत्त!
-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
____________________
ऋणमुक्ति आजकल बहुत से लोगों के लिए एक अत्यंत संवेदनशील और महत्वपूर्ण विषय बन गया है। कई लोगों को जीवन में ऋण लेना पड़ता है, लेकिन अब उसे चुकाना मुश्किल होता जा रहा है। आज के समय में ऋण प्राप्त करना जितना आसान हो गया है, उतना ही उसे चुकाना कठिन होता जा रहा है। ऐसे में कई जातक किसी विशेष मंत्र या उपासना के बारे में पूछते हैं, परंतु केवल एक ही मंत्र या उपासना से ऋण खत्म हो जाए – ऐसा नहीं होता। अगर ऐसा होता, तो सभी लोग ऋण लेकर वही मंत्र पढ़कर ऋणमुक्त हो गए होते।
ऋणमुक्ति के लिए आपकी कुंडली का विश्लेषण अत्यंत आवश्यक होता है। उसी के आधार पर यह तय किया जा सकता है कि कौन-सा उपाय या उपासना आपके लिए उपयुक्त है।
ऋण कई प्रकार के होते हैं –
यदि बैंक से ऋण लिया गया हो, तो कुंडली में षष्ठ भाव (छठा भाव) और व्यय भाव (बारहवां भाव) को देखना चाहिए। इन भावों के स्वामी कहां हैं, किन ग्रहों के साथ हैं, और किन ग्रहों से युति या दृष्टि संबंध बना रहे हैं, इसका अध्ययन आवश्यक है।
यदि निजी साहूकार से ऋण लिया गया हो, तो सप्तम भाव (सातवां भाव) को देखना चाहिए।
यदि रिश्तेदारों से ऋण लिया गया हो, तो तृतीय भाव (तीसरा भाव) का विश्लेषण करना चाहिए।
कई लोगों को लगता है कि अचानक कहीं से धन प्राप्त हो और सारा ऋण समाप्त हो जाए। हालांकि ऐसा आमतौर पर नहीं होता, लेकिन कुछ विशेष कुंडलियों में अचानक धन प्राप्ति के योग होते हैं।
इसके लिए पंचम भाव की जांच करनी चाहिए (यह भाव लॉटरी, सट्टा, शेयर आदि से संबंधित है)।
इसके साथ नवम भाव भी देखना चाहिए कि भाग्य से ऐसा कुछ संभव है या नहीं।
ऋण कब समाप्त होगा यह भी कुंडली से पता चल सकता है। इसके लिए:
छठा भाव, बारहवां भाव, सातवां भाव और दूसरा भाव (धन भाव)
इन भावों के स्वामी ग्रह, इन भावों में स्थिति ग्रह,
वर्तमान में चल रही महादशा और अंतर्दशा,
और अष्टकवर्ग में इन भावों को प्राप्त अंक (गुण) – इन सभी का विश्लेषण आवश्यक होता है।
इसी अध्ययन के आधार पर यह भी बताया जा सकता है कि कौन-सी देवता की उपासना या कौन-से उपाय करने से ऋणमुक्ति संभव होगी।
इसके साथ ही दशम भाव और लाभ भाव (ग्यारहवां भाव) को भी देखना चाहिए क्योंकि इन्हीं से लाभ और कार्यक्षमता का निर्धारण होता है।
अष्टम भाव से यह भी जाना जा सकता है कि आपको जीवनसाथी के परिवार से आर्थिक मदद मिलेगी या नहीं।
इस प्रकार संपूर्ण कुंडली का गहराई से अध्ययन करके ही ऋणमुक्ति के उपाय बताए जा सकते हैं। इसके लिए सायन कुंडली का विचार करना अधिक लाभकारी होता है।
यदि किसी को नशे की आदतों के कारण ऋण हुआ हो, और वो अभी भी उनका शिकार हो, तो कोई भी उपासना फल नहीं देती। पहले ऐसे व्यक्ति को पूरी तरह नशों से मुक्ति पानी ही होगी – यह ध्यान में रखना चाहिए।
आपकी क्षमता है, इसीलिए आपको ऋण मिला है। इसलिए निराश न हों। मन से प्रयास करें – ऋण अवश्य चुकता होगा।
देवता की उपासना और उचित उपाय अवश्य करें। (ध्यान रहे, ये उपाय कम खर्चीले होने चाहिए – महंगी पूजा, शांति आदि की आवश्यकता नहीं है।)
लेकिन संयम बहुत जरूरी है।
किसी एक ज्योतिषाचार्य पर विश्वास करें। वरना आप भ्रमित हो जाएंगे और कोई भी उपासना पूर्ण नहीं होगी। आत्मविश्वास बढ़ाएं और निरंतर प्रयास करते रहें।
एक दिन आप निश्चित ही ऋणमुक्त होंगे।
श्री गुरुदेव दत्त!
— ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. ???? 8087520521