(राष्ट्रीय पोषण सप्ताह : १ सप्टेंबर २०२५)
"Eat Right for Healthy Life" – म्हणजेच योग्य खा आणि निरोगी जगा. आपल्या दैनंदिन आहारात पोषणमूल्य असलेले पदार्थ असले तर शरीर सशक्त राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मानसिक आरोग्यही चांगले राहते.
धान्ये व तृणधान्ये – भात, गहू, ज्वारी, बाजरी हे उर्जेचे स्त्रोत आहेत.
डाळी व कडधान्ये – प्रथिनांसाठी आवश्यक.
फळे व भाज्या – जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ पुरवतात.
दुग्धजन्य पदार्थ – कॅल्शियमसाठी उपयुक्त.
सुकामेवा व बिया – मेंदूसाठी चांगले फॅट्स आणि उर्जा देतात.
योग्य प्रमाणात पाणी पिणे हेही पोषणाचा एक भाग आहे. दिवसभरात ७–८ ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.
वेळेवर जेवा.
जंक फूड, जास्त तेलकट पदार्थ टाळा.
व्यायाम, योगा आणि चालणे या गोष्टींना आहाराइतकेच महत्त्व द्या.
मन प्रसन्न ठेवण्यासाठी सकारात्मक विचार जोपासा.
राष्ट्रीय पोषण सप्ताह आपल्याला आठवण करून देतो की, "योग्य आहार हेच खरे औषध" आहे. संतुलित, स्वच्छ आणि पोषक आहार घेतल्यास निरोगी व आनंदी जीवन जगता येते.