आयुष्याचे रंग – फुलपाखरासारखे जगणे! – सुनिता शेलार
आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास. प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन अनुभव दडलेला असतो. कधी हास्य, कधी आसवं, कधी आनंद, तर कधी शांतता — हे सगळं मिळूनच तर आयुष्याचे खरे सौंदर्य घडतं.
"Surround yourself with positivity and let your smile change the world."
जगण्याची मजा म्हणजे केवळ मोठं होणं, पैसे कमावणं किंवा नाव कमावणं नाही; तर छोट्या-छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधणं. पावसाच्या थेंबात भिजणं, सुर्यास्तात हरवणं, मित्रांसोबत हसणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं — हेच तर खरे जगणे आहे.
कधी कधी आयुष्यात खाचखळगे येतात, पण तेच आपल्याला मजबूत बनवतात. ज्याच्या आयुष्यात अडचणी नाहीत, त्याने कधीच जगण्याचे खरे रंग अनुभवलेले नसतात. सुख-दुःख, हसू-रडणं, यश-अपयश — हे सगळं मिळूनच पूर्ण आयुष्य तयार होतं.
फुलपाखरू जसं एका दिवसाचं आयुष्य जगतं, पण त्या एका दिवसात ते प्रत्येक फुलावर बसून, प्रत्येक रंगात रमून जगतं — तसं आपलंही आयुष्य असावं. कमी का असेना, पण भरपूर रंगांनी भरलेलं!
मी तर मनानं खूप मस्तिखोर आहे! "Happiness is a choice, and today I choose to be happy."
मला माझं आयुष्य फुलपाखरासारखं जगायला आवडतं — मोकळं, रंगीबेरंगी आणि आनंदी! जिथं जाईन तिथं थोडा आनंद उधळावा, निसर्गात, माणसात आणि स्वतःमध्येही सौंदर्य शोधावं.
जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नव्हे, तर प्रत्येक श्वासात आनंद अनुभवणं — हाच खऱ्या अर्थाने जगण्याचा मंत्र आहे!