आपल्या शरीरात युरीक अॅसिड नैसर्गिकरित्या तयार होत असतो. हे अॅसिड purines या घटकांचं विघटन झाल्यानंतर तयार होतं. सामान्यतः शरीर हे अॅसिड मूत्राच्या माध्यमातून बाहेर टाकतं. मात्र काही वेळा याचे प्रमाण वाढतं आणि यामुळे गाठी (gout), सांधेदुखी, मूत्रविकार यांसारख्या समस्या निर्माण होतात.
चला तर पाहूया युरीक अॅसिड वाढण्याची प्रमुख कारणं:
रेड मीट (मटण), मासे (विशेषतः सारडिन्स, अँचोवीज), दालिंबा, राजमा, मशरूम आणि काही प्रकारच्या डाळी या अन्नपदार्थांमध्ये purines चं प्रमाण जास्त असतं.
बीअरमध्ये purine चं प्रमाण जास्त असून ते युरीक अॅसिडचे प्रमाण वाढवू शकतं. तसेच मद्य शरीरात पाण्याचं प्रमाण कमी करतं, ज्यामुळे अॅसिड बाहेर टाकणं कठीण होतं.
शरीरात पुरेसं पाणी नसल्यास मूत्राद्वारे युरीक अॅसिड बाहेर जात नाही, आणि ते शरीरात साचतं.
लठ्ठपणा हा अनेक आजारांचं मूळ कारण असतो. युरीक अॅसिड वाढण्यास सुद्धा लठ्ठपणाचं मोठं योगदान असतं.
किडनी नीट काम करत नसेल तर युरीक अॅसिड नीट फिल्टर होत नाही आणि शरीरात साचतं.
काही विशिष्ट औषधं (उदा. डाय्युरेटिक्स, अॅस्पिरिन) सुद्धा युरीक अॅसिडचं प्रमाण वाढवतात.
वरील माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी दिली आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. कोणतेही उपचार, औषधोपचार किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.