जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना ! उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली विशेष बैठक

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना ! उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली विशेष बैठक
  • Positive News
  • ऑगस्ट 26 2026

Share on  

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना ! उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली विशेष बैठक

जळगाव :  सर्व औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांबाबत आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय येथे बैठक पार पडली

यावेळी बोलताना, महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण–२०२५ नुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा समावेश ‘डी+’ क्षेत्रात करण्यात आला आहे. 

संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा ‘डी+’ क्षेत्रात समावेश करावा, ही जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांची सातत्यपूर्ण मागणी होती. या मागणीची दखल घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे जळगावमध्ये नवीन उद्योग व गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला अधिक गती मिळेल. 

जळगावच्या औद्योगिक प्रगतीसाठी दिलेला शब्द पूर्ण केला, असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.गुलाबरावजी पाटील, वस्त्रोद्योग मंत्री श्री.संजयजी सावकारे, आमदार श्री.सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार श्री.किशोरजी पाटील, आमदार श्री.प्रा.चंद्रकांतजी सोनवणे, आमदार श्री.अमोल जावळे, आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या